माजी उपसभापतीची नक्षलवाद्यांकडून हत्या

By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T01:03:52+5:302014-05-30T01:03:52+5:30

एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती व पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता निघृण हत्या केली.

Former Deputy Speaker Naxalites killed | माजी उपसभापतीची नक्षलवाद्यांकडून हत्या

माजी उपसभापतीची नक्षलवाद्यांकडून हत्या

एटापल्ली : क्वॉर्टरमध्येच गोळ्या झाडल्या
एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती व  पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून गुरूवारी  सायंकाळी ७.३0 वाजता निघृण हत्या केली. या घटनेमुळे एटापल्ली गावात कमालीची दहशत  पसरली आहे.
एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घिसू दुहटा मट्टामी (३८)  हे एटापल्ली येथील पंचायत समिती सभापतीच्या  क्वॉर्टरमध्ये सायंकाळी पत्नीसोबत बाहेर बसले  असताना नक्षलवादी तेथे आल व त्यांनी घिसू मट्टामी यांच्यावर ५ ते ६ गोळ्या अगदी जवळून  झाडल्या. ते जागीच ठार झाले. सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घिसू मट्टामी  हे एटापल्ली तालुक्याच्या हालेवारा गावचे मुळ रहिवासी आहेत. त्यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून  धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हालेवारा गाव सोडून दिले होते. त्यांची पत्नी २0१२ च्या  पंचायत समिती निवडणुकीत हालेवारा भागातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या  व पंचायत समितीच्या सभापती झाल्या. यापूर्वी घिसू हे पंचायत समितीचे उपसभापती होते. घिसू  मट्टामी यांच्या पश्‍चात पत्नी ललिता व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. नक्षलवाद्याच्या भितीमुळे  याच गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते o्रीनिवास गोडसेलवार यांनीही हालेवारा गाव सोडून  गडचिरोलीत आपले कुटुंब थाटले आहे.  (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Former Deputy Speaker Naxalites killed