शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम पाळाल, तरच मिळेल वाहन कर्जाला ग्रीन सिग्नल!

By admin | Updated: December 26, 2014 04:49 IST

यापुढे सिग्नल तोडला, लेन कटिंग केली, नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली किंवा कोणताही वाहतुकीचा नियम मोडला तर ट्रॅफिक पोलिसांना दंड दिला

किशोर वंजारी, नेर (जि. यवतमाळ) -हातउसने घेतलेल्या १० हजार रुपयांची परतफेड थकल्याने एका पित्याला चक्क आपल्या मुलाला गहाण ठेवावे लागल्याची खळबळजनक घटना मेळघाटात घडली आहे. अगतिक पित्यापुढे पर्याय नव्हता, पण वसुली करणाऱ्या व्यक्तीनेही निलाजरेपणाने या लहानग्याचा स्वीकार करून त्याला कामासाठी जुंपत माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे. घडलेली हकिकत अशी, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पिंपळगाव (डुब्बा) या गावातील सीताराम कोडापे नावाचा मेंढपाळ तीन महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील डाबका (ता. धारणी) गावी आपल्या जावयाकडे गेला होता. तेथे त्याची भेट संजू कासदेकर या शेतमजुराशी झाली. कासदेकर बटईने शेती करतात. त्यांना दोन पत्नी, चार मुले व दोन मुली असा मोठा कुटुंबकबिला असल्याने खर्च आणि उत्पन्नाची हातमिळवणी होत नव्हती. उधार-उसनवारी करत गुजराण चालू होती. मेंढपाळांकडे बक्कळ पैसे असतात आणि ते उधारीवर देतात, अशी माहिती मिळताच कासदेकर यांनी गावात आलेल्या सीताराम कोडापे नावाच्या मेंढपाळाला गाठले. आर्थिक परिस्थितीचे गाऱ्हाणे गात त्याच्याकडे उधारीवर १० हजार रुपयांची मागणी केली. रकमेची परतफेड करण्यासाठी आपल्या १४वर्षीय महादेव या मुलाला तारण म्हणून मेंढपाळाकडे ठेवण्याची तयारी दर्शविली. मेंढपाळाला हा व्यवहार मान्य झाला. त्याने मुलाच्या बदल्यात पित्याच्या हातावर १० हजार रुपये टेकविले. मुलाला सोबत घेऊन मेंढपाळ आपल्या गावी पिंपळगाव (डुब्बा) येथे परत आला. गेल्या तीन महिन्यांपासून महादेव मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्याचे काम करीत होता.असा झाला मेंढपाळाचा पर्दाफाश...मंगळवार, २३ डिसेंबर रोजी या घटनेचा रहस्यमयरीत्या पर्दाफाश झाला. नेहमीप्रमाणे मेंढ्या चारण्याऐवजी महादेवने अनवाणी पायाने तिथून पळ काढला. तीन दिवसांपूर्वी मेंढ्या चारत असताना एका मेंढीच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे मेंढपाळ त्याच्यावर रागावला. मालक आता आपल्याला मारेल या भीतीपोटी तो तिथून पळाला होता. नेर तालुक्यातील वटफळी-पिपरी-मुखत्यारपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरेस तो पडला तेव्हा त्याच्या अंगावर कपडा नव्हता. तो सारखा रडत होता. शेतकऱ्यांनी त्याची विचारपूस केली असता ‘कर्जाच्या मोबदल्यात तारण’ हा प्रकार पुढे आला. शेतकऱ्यांनी त्याला धनज येथील पोलीस पाटलाच्या मदतीने नेर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता महादेवने घडलेली हकिकत कथन केली.