वाहतुकीचे नियम पाळाल, तरच मिळेल वाहन कर्जाला ग्रीन सिग्नल!

By admin | Published: December 26, 2014 04:49 AM2014-12-26T04:49:00+5:302014-12-26T04:49:00+5:30

यापुढे सिग्नल तोडला, लेन कटिंग केली, नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली किंवा कोणताही वाहतुकीचा नियम मोडला तर ट्रॅफिक पोलिसांना दंड दिला

Follow the rules of traffic, the vehicle will get the green signal! | वाहतुकीचे नियम पाळाल, तरच मिळेल वाहन कर्जाला ग्रीन सिग्नल!

वाहतुकीचे नियम पाळाल, तरच मिळेल वाहन कर्जाला ग्रीन सिग्नल!

Next

किशोर वंजारी, नेर (जि. यवतमाळ) -हातउसने घेतलेल्या १० हजार रुपयांची परतफेड थकल्याने एका पित्याला चक्क आपल्या मुलाला गहाण ठेवावे लागल्याची खळबळजनक घटना मेळघाटात घडली आहे. अगतिक पित्यापुढे पर्याय नव्हता,
पण वसुली करणाऱ्या व्यक्तीनेही निलाजरेपणाने या लहानग्याचा स्वीकार करून त्याला कामासाठी जुंपत माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे.
घडलेली हकिकत अशी, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पिंपळगाव (डुब्बा) या गावातील सीताराम कोडापे नावाचा मेंढपाळ तीन महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील डाबका (ता. धारणी) गावी आपल्या जावयाकडे गेला होता. तेथे त्याची भेट संजू कासदेकर या शेतमजुराशी झाली. कासदेकर बटईने शेती करतात. त्यांना दोन पत्नी, चार मुले व दोन मुली असा मोठा कुटुंबकबिला असल्याने खर्च आणि उत्पन्नाची हातमिळवणी होत नव्हती. उधार-उसनवारी करत गुजराण चालू होती. मेंढपाळांकडे बक्कळ पैसे असतात आणि ते उधारीवर देतात, अशी माहिती मिळताच कासदेकर यांनी गावात आलेल्या सीताराम कोडापे नावाच्या मेंढपाळाला गाठले. आर्थिक परिस्थितीचे गाऱ्हाणे गात त्याच्याकडे उधारीवर १० हजार रुपयांची मागणी केली.
रकमेची परतफेड करण्यासाठी आपल्या १४वर्षीय महादेव या मुलाला तारण म्हणून मेंढपाळाकडे ठेवण्याची तयारी दर्शविली. मेंढपाळाला हा व्यवहार मान्य झाला. त्याने मुलाच्या बदल्यात पित्याच्या हातावर १० हजार रुपये टेकविले. मुलाला सोबत घेऊन मेंढपाळ आपल्या गावी पिंपळगाव (डुब्बा) येथे परत आला. गेल्या तीन महिन्यांपासून महादेव मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्याचे काम करीत होता.

असा झाला मेंढपाळाचा पर्दाफाश...

मंगळवार, २३ डिसेंबर रोजी या घटनेचा रहस्यमयरीत्या पर्दाफाश झाला. नेहमीप्रमाणे मेंढ्या चारण्याऐवजी महादेवने अनवाणी पायाने तिथून पळ काढला. तीन दिवसांपूर्वी मेंढ्या चारत असताना एका मेंढीच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे मेंढपाळ त्याच्यावर रागावला. मालक आता आपल्याला मारेल या भीतीपोटी तो तिथून पळाला होता.

नेर तालुक्यातील वटफळी-पिपरी-मुखत्यारपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरेस तो पडला तेव्हा त्याच्या अंगावर कपडा नव्हता. तो सारखा रडत होता. शेतकऱ्यांनी त्याची विचारपूस केली असता ‘कर्जाच्या मोबदल्यात तारण’ हा प्रकार पुढे आला. शेतकऱ्यांनी त्याला धनज येथील पोलीस पाटलाच्या मदतीने नेर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता महादेवने घडलेली हकिकत कथन केली.

 

Web Title: Follow the rules of traffic, the vehicle will get the green signal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.