शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळांना पाच वर्षे मुदतवाढ

By admin | Updated: May 2, 2015 01:04 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांचे अस्तित्व आणखी ५ वर्ष कायम राहणार आहे.

कमल शर्मा, नागपूरविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांचे अस्तित्व आणखी ५ वर्ष कायम राहणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केलेली शिफारस मान्य करून राष्ट्रपतींनी ३० एप्रिल २०२०पर्यंत मुदतवाढ दिली.विकास मंडळांची मुदत ३० एप्रिलपर्यंतच होती. त्यामुळे गुरुवारी सर्वांच्या नजरा राज्यपालांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास राजभवनातून संदेश प्राप्त झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या सचिवांनी विदर्भ विकास मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनुपकुमार यांना दूरध्वनीवरून कार्यकाळ विस्ताराची माहिती दिली. त्यामुळे आता विकास मंडळ ५ वर्षांपर्यंत कार्यरत राहील. राज्यपालांचे विशेषाधिकारही कायम ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी २०१०मध्ये मंडळाच्या कार्यकाळ विस्तारावरून संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ३० एप्रिल २०१० रोजी तीनही मंडळांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढविला होता. याला विदर्भवाद्यांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारने सहा महिन्यांनंतर विदर्भासह ३ मंडळांना ३० एप्रिल २०१५पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवार हा अंतिम दिवस होता. विदर्भ विकास मंडळाच्या कार्यालयात रात्री ७.३० वाजेपर्यंत ई-मेल तपासले जात होते. फॅक्सवरही अधिकाऱ्यांचे लक्ष होते. राष्ट्रपतींचा आदेश राजभवनातून येणार असल्याने तेथेही संपर्क साधण्यात येत होता.