शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत पाच जण ठार

By admin | Updated: October 29, 2016 23:53 IST

जिल्ह्यातील कर्जत व पारनेर तालुक्यात शनिवारी दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत व पारनेर तालुक्यात शनिवारी दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला़ नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाणनजीक (पारनेर) भरधाव मोटारीची टक्कर होऊन मोटारसायकलवरील तिघे जागीच मृत्युमुखी पडले. तर नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगावनजीक मोटार-आराम बस यांच्यात झालेल्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला़ नारायणगव्हाणनजीकच्या अपघातात किरण चंद्रकांत चांदणे (वय २२), विनोद चंद्रकांत चांदणे (२४), रोहित सुंदर झिने (१८, तिघे रा. हार्शी ता. पैठण जि. औरंगाबाद) हे मृत्युमुखी पडले. मृत तिघे मोटारसायकलवरून पुण्याहून नगरच्या दिशेने जात होते. समोरून आलेल्या मोटारीशी त्यांची टक्कर झाली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. किरण आणि विनोद चांदणे हे दोघे सख्ख्ये भाऊ आहेत. मिरजगावनजीकच्या अपघातात योगेश बाळासाहेब मांडगे (२४) व सुरेखा बाळासाहेब मांडगे (४४, रा़ गायकरवाडी, ता़ कर्जत) हे मायलेक मृत्युमुखी पडले़ योगेश मोटारीमधून आई सुरेखा यांना नगर येथे आरोग्य तपासणीसाठी घेऊन आला होता़ परतत असताना खासगी आराम बसने त्यांना टक्कर दिली. अपघातानंतर बसने सुमारे साठ फूट मोटारीला फरफटत नेले़ नंतर बस विजेच्या खांबावर आदळली़ हा आवाज ऐकून या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दोन्ही अपघातग्रस्त वाहनांवर विद्युतप्रवाह चालू असलेल्या तारा पडलेल्या होत्या़ त्यांनी प्रथम वीजपुरवठा खंडित केला़ यानंतर मोटारीतून आई व मुलाला बाहेर काढले़ मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती़ आराम बसमध्ये ६० प्रवासी होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)- योगेश हा एकुलता एक मुलगा होता़ नुकतेच त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते़ आई व मुलाचा असा अचानक अंत झाल्याने गायकरवाडीवर दु:खाची छाया पसरली़ शोकाकुल वातावरणात या माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.