शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.ची प्रथमच प्रवासी भाड्यात १0 टक्के कपात

By admin | Updated: June 16, 2014 00:50 IST

आवडेल तेथे प्रवास झाला स्वस्त

बुलडाणा : उन्हाळ्याच्या सुटीमध्ये देवदर्शन, पर्यटनाला जाणार्‍या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाने ह्यआवडेल तेथे प्रवासह्णही योजना सुरू केली आहे. बहुतेक प्रवासी या योजनेचा बर्‍यापैकी लाभ घेतात. आता १५ जून पासून या योजनेच्या भाड्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाने १0 ते १५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे ह्यअवडेल तेथे प्रवासह्ण पुन्हा स्वस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये बहुतेकजण फीरायला जातात. देवदर्शन, पर्यटन आणि खास उन्हाळ्यात नातेवाईकांच्या भेटी गाठीचा अनेकांचा बेत असतो. यासाठी संपूर्ण कुटुंब जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा याचा लाभ प्रवाशा बरोबरच एसटीला सुध्दा व्हावा म्हणुन राज्य परिवहन महामंडळाने ह्यआवडेल तेथे प्रवासह्ण ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत प्रवाशांना एक रकमी प्रवासभाडे भरून चार दिवसाची पास दिल्या जाते. यामध्ये प्रवास भाड्यात बर्‍यापैकी सुट मिळते. आता शाळांच्या सुट्या संपत आल्या, पावसाळ्याला सुध्दा सुरूवात होत आहे. त्यामुळे एसटीचे प्रवासी भारमान कमी होते. त्यामुळे १५ जून पासून या योजनेच्या भाड्यामध्ये कपात करण्यात आली आहे. काल पर्यंत चार दिवसाच्या प्रवासासाठी ८00 रुपये मोजावे लागत होते. आता प्रवास भाडे ७४0 रुपये आणि स्मार्ट कार्डाचे ४0 रुपये असे ७८0 रुपये द्यावे लागणार आहे. ही भाडे कपात १४ ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. १४ ऑक्टोबर पासून पुन्हा नव्याने या योजनेची भाडेवाढ होईल. यावर्षी मागील दरांपेक्षा जवळपास १0 ते १५ टक्के दराने भाड्यामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आवडीचा प्रवास स्वस्त झाला आहे. कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षात जवळपास दुपटीने सर्वच भाडे दरामध्ये वाढ झालेली आहे. सातत्याने ही भाव वाढ सुरू असताना आवडेल तिथे प्रवास या प्रवास सवलत योजनेमध्ये १0 ते १५ टक्के भाडे कपात करून प्रवाशांना महामंडळाने सुखद धक्का दिला आहे. एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून यावर्षी प्रथमच एसटीचा वर्धापनदिन राज्यभर साजरा होत असताना नेमके या वर्धपान दिनीच प्रवासी भाडेवाढ करून ह्यसामान्याचीह्ण म्हणविणार्‍या एसटीला भाडेवाढीची नामुस्की पत्कारावी लागली होती. आता आवडेल तेथे प्रवास योजनेमध्ये भाडे कमी करून प्रवाशांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीच्या कालावधीसाठी या तिकिटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात एसटीने थोडासा दिलासा दिला. इतर वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होत असल्याचे चित्र दिसत आहे.

** योजनेची वर्षभरात दोन गटात केली विभागणी

या योजनेची प्रामुख्याने दोन गटांत विभागणी केली असून, १५ ऑक्टोबरपासून ते १४ जूनपयर्ंत गर्दीच्या कालावधीत तिकिटांचे वाढीव दर राहणार आहेत. तर कमी गर्दीच्या म्हणजे १५ जूनपासून ते १४ ऑक्टोंबरपयर्ंत तिकिटांत दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बसेससाठी १ हजार ४00 तर मुलांसाठी ७00 रुपए भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६0५ तर मुलांसाठी ८0५ रुपए ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३0 तर मुलांसाठी ८६५ रुपए भरून प्रवास करता येणार आहे.