शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या शाहिरी महोत्सवाचा डफ आज कडाडणार

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

महापालिकेकडून आयोजन : दहा शाहिरी पथकांचा सहभाग

कोल्हापूर : आपल्या पहाडी आवाजाने जनसमुदायास मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या आणि समाजातील अनिष्ट रूढींवर तितक्यात तिखट शब्दवाणींने प्रहार करणाऱ्या शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे उद्या, मंगळवारी शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिलाच महोत्सव असल्याने जिल्ह्यातील दहा निवडक शाहिरी पथकांना त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती महापौर तृप्ती माळवी यांनी आज, सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.उद्या सकाळी दहा वाजता पेटाळ्यातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये शाहिरी महोत्सवाचे महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. या समारंभास महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक विश्वस्त मंडळातर्फे सकाळी नऊ वाजता शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा येथून दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच अशा प्रकारचा शाहिरी महोत्सव भरविण्यात येत असल्याने जिल्ह्यातीलच दहा शाहिरी पथकांना त्यामध्ये सामावून घेतले आहे. दहाही पथके या महोत्सवात आपली शाहिरी कला सादर करतील. महोत्सवात भाग घेतल्याबद्दल सर्वच पथकांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस तसेच मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, नगरसेविका माधुरी नकाते, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) राजाराम जगताप यांचा गौरव गेली अनेक वर्षे निष्ठेने शाहिरी कलेची सेवा करणाऱ्या शाहीर राजाराम जगताप (इचलकरंजी) यांचा ‘पिराजीराव सरनाईक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजाराम जगताप यांचा गौरव गेली अनेक वर्षे निष्ठेने शाहिरी कलेची सेवा करणाऱ्या शाहीर राजाराम जगताप (इचलकरंजी) यांचा ‘पिराजीराव सरनाईक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.