शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आधी राजीनामे, मगच कामकाज

By admin | Updated: July 25, 2015 01:22 IST

राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि शैक्षणिक अर्हतेबाबत खोटी माहिती दिल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात ठोस पुरावेदेखील

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि शैक्षणिक अर्हतेबाबत खोटी माहिती दिल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात ठोस पुरावेदेखील सादर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री चौकशीपूर्वीच संबंधित मंत्र्यांना क्लीन चिट देत असून, संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, तोवर सभागृहाचे कामकाज न चालू देण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, अनेक मंत्र्यांवर सबळ पुराव्यानिशी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अनेक मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता दडविल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मंत्र्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणांची चौकशी करण्याऐवजी संबंधितांना ‘क्लीन चिट’ देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. भ्रष्टाचार व इतर आरोपांची चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. आरोप असलेले मंत्री पदावर राहणार असतील तर ती चौकशी निष्पक्ष होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेऊन त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)