शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबईतून पहिलं विमान उड्डाण करेल - मुख्यमंत्री फडणवीस

By admin | Updated: September 13, 2016 18:59 IST

डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल याची खात्री मी देतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल याची खात्री मी देतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. सोबतच पुणे विमानतळाचा कायापालट करण्यात येणार असून लवकरच हे स्वप्न सत्यात उतरेल असंही सांगितलं आहे. 
 
(2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला डिजिटली कनेक्ट करणार)
 
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पायाभूत सुविधांचा विकास कमीत कमी वेळात साधला जाऊ शकतो. यामुळे लोकांचं आयुष्य बदलेल. डिजिटल क्रांतीमुळे महाराष्ट्राचं रुप बदलेल. 2018 पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात फायबर कनेक्विव्हिटी करण्यात येईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 
 
(अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है - नितिन गडकरी)
 
स्त्यांचा दर्जा हा तुमच्या विकासाचा मार्ग असतो असं अटलजी सांगायचे. चांगले रस्ते संधी उपलब्ध करुन देतात. सध्या 6 लाख गावे एकमेकांना जोडली आहेत. पण पंतप्रधानांना प्रत्येक गावाला डिजिटलच्या माध्यमातून जोडायचे आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून 8 मंजु-या अडकून होत्या, पण मोदींनी व्हिडिओमध्येच मंजुरी देऊन टाकली. 7 मंजु-या एका दिवसात आणि शेवटची सात दिवसांमध्ये, ही मोदींची काम करण्याची पद्दत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 
राज्यातील 10 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित आहेत. पुढील 3 वर्षात हे प्रकल्प पुर्ण करणार आहोत यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सहमती दर्शवली आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेडप्रमाणे अनेक प्रलंबित प्रकल्प होते. एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. मात्र फंडिंग न मिळाल्याने प्रकल्प प्रलंबित राहिले. आता असं होणार नाही. आम्ही हे प्रकल्प पुर्ण करुन रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम भागांना जोडणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
(... तर महाडची दुर्घटना टळली असती - नितिन गडकरी)
 
मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये या कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.  मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाची रुपरेषा लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी मांडली. लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी कॉनक्लेव्हची संकल्पना विषद केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सर्व मान्यवरांचे आभार लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडले.