शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रामदास बोडखेंविरूद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: August 20, 2014 00:43 IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

अकोला: बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्यासह त्यांची सहा मुलं आणि भावाविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी गुन्हा दाखल केला. १९९९ ते २00४ या कालावधीत आमदार रामदास बोडखे हे अकोला जिल्ह्यातील आकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते भारिप-बहुजन महासंघाच्या तिकीटावर निवडून आले होते. २00१ साली माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसने त्यांना रोजगार हमी योजनेचे राज्यमंत्री पद बहाल केले. त्या कालावधीत विविध प्रकारचा अपहार करून बोडखे यांनी ३0 लाख ३४ हजार १५८ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याची तक्रार आकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे यांनी १२ वर्षांपूर्वी एसीबीकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे एसीबीने तपास केला. तपासामध्ये बोडखे यांनी त्यांच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता जमवल्याचे निष्पन्न झाले. बोडखे यांनी अपहारातून लाखो रुपयांची संपत्ती गोळा करून, ती त्यांची सहा मुलं व भावाच्या नावे केल्याचेही तपासामध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे रामदास बोडखे यांच्यासह त्यांची सहा मुले व भावाविरुद्ध कलम १३(१) ई सह १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ तसेच भादंविचे कलम १0९ अन्वये आकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

** बंगल्याची झडती

माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, त्यांची मुलं तसेच भावाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी बोडखे यांच्या आकोटमधील बंगल्याची झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत झडती घेण्याचे काम सुरूच होते. एसीबी अधिकार्‍यांकडून बोडखे यांच्या शैक्षणिक संस्था तसेच संपत्तीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू होती.

** सहा मुलं आणि भावाविरुद्धही गुन्हा दाखल

माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांनी लाखो रुपयांची मालमत्ता खरेदी करून, ती त्यांची सहा मुलं माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, विजय, दीपक, प्रमोद, मनोज, प्रवीण आणि भाऊ देवीदास बोडखे यांच्या नावे केली. त्यामुळे एसीबीने या सर्वांविरुद्धही गुन्हा दाखल केला.