शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पाचवीतील विद्यार्थी बनतोय '' अ‍ॅप मास्टर''

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 1:47 PM

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्याचे प्रेरणास्थान असल्याने त्यांचाच जीवनप्रवास उलगडणारे पहिले अ‍ॅप त्याने बनविले.

ठळक मुद्देआतापर्यंत गेम्स, आरोग्य, शिक्षणासह विविध घटकांशी संबंधित ३० हून अधिक अ‍ॅपची निर्मिती

पुणे : प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन असून त्यात विविध प्रकारची अ‍ॅप डाऊनलोड केलेली असतात. ही अ‍ॅप विकसित करणे तितकेसे सोपे नसते. पण पाचवीतील एका विद्यार्थ्याने अनेक प्रकारची अ‍ॅप बनवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्याचे प्रेरणास्थान असल्याने त्यांचाच जीवनप्रवास उलगडणारे पहिले अ‍ॅप त्याने बनविले. तर आतापर्यंत गेम्स, आरोग्य, शिक्षणासह विविध घटकांशी संबंधित ३० हून अधिक अ‍ॅप त्याने बनविले आहेत.सफल सावंत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सध्या नांदेड सिटीमधील पवार पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. त्याचे वडील संजय सावंत हे आयटी क्षेत्रामध्ये असल्याने सफल यालाही लहानपणापासून या क्षेत्राची ओढ आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीमध्ये त्याने अ‍ॅप बनविणे, तसेच इतर प्रोग्रामिंगची ऑनलाईन माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यामध्ये त्याने अ‍ॅप बनविण्याचे धडे गिरविले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी त्याच्या मनात खुप कुतूहल आहे. ते आपले प्रेरणास्थान असल्याचे तो सांगतो. त्यामुळे पहिले अ‍ॅप त्यांच्या जीवनावरच बनविण्याचा निर्णय त्याने घेतला. डॉ. कलाम यांची काही पुस्तके त्यांने वाचली होती. तसेच इतर पुस्तके व माध्यमांतून त्याने माहिती एकत्रित केली. या माहितीचा वापर करून त्याने अ‍ॅप बनविले आहे.हे अ‍ॅप नुकतेच गुगल प्ले स्टोअरवर आले आहे. त्यामध्ये कलाम यांचा जीवनप्रवास, त्यांचे प्रेरणादायी विचार, पुस्तके, यशस्वी प्रकल्प, पुरस्कार, उल्लेखनीय कामांचा समावेश करण्यात आला आहे. या अ‍ॅपचे नुकतेच लोकार्पणही करण्यात आले . या अ‍ॅपप्रमाणेच त्याने काही गेम्स, कॅलक्युलेटर, शाळा निकाल सिस्टीम, आंब्याची ऑनलाईन ऑर्डर, आरोग्य यांसह विविध प्रकारची ३० हून अधिक अ‍ॅप बनविली आहेत. त्यासाठी वडिलांसह शाळेमधूनही त्याला सहकार्य करण्यात आले, असे संजय सावंत यांनी सांगितले.-------------

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम