शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना अग्नी देऊन दिला बारावीचा पेपर

By admin | Updated: February 27, 2015 02:02 IST

सहा महिन्यांपूर्वीच ती आईच्या मायेला पारखी झाली, त्यातच वडीलांचेही छत्र हरपले. मात्र शिक्षणाचा ध्यास घेत श्रद्धाने वडिलांना अग्नी देऊन बारावीचा पेपर लिहिला

हडपसर : सहा महिन्यांपूर्वीच ती आईच्या मायेला पारखी झाली, त्यातच वडीलांचेही छत्र हरपले. मात्र शिक्षणाचा ध्यास घेत श्रद्धाने वडिलांना अग्नी देऊन बारावीचा पेपर लिहिला. शिक्षणावरील या श्रद्धेने तिने विद्यार्थीमित्रांपुढे नवा आदर्श ठेवला आहे. श्रद्धा मनोज कदम (१९, रा. ढेरे बंगला, गोपाळपट्टी, मांजरी बु.) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर बारावीचा दुसरा पेपर दिला आणि लगेचच वडिलांच्या निधनाची बातमी तिला ऐकावी लागली. बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. गुरुवार सकाळी साडे नऊ वाजता श्रद्धाने वडिलांना मांजरी गावातील स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला व ११ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाली.दरम्यान, श्रद्धाला पेपर देण्यास धीर मिळावा म्हणून तिच्या चुलत बहिणीला गुरुवारी परीक्षा हॉलच्या बाहेर बसविण्या आले होते, असे साधना विद्यालयाचे प्राचार्या के. डी. रत्नपारखी यांनी सांगितले.श्रद्धा कदम या विद्यार्थिनीवर झालेला भावनिक आघात पाहता तिने परीक्षेला दाखविलेली उपस्थिती सर्वच विद्यार्थ्यांना आदर्श ठरली. आज दिवसभर हडपसरमध्ये तिच्या उपस्थितीचा विषय चर्चेचा ठरला.