शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: August 24, 2016 15:56 IST

धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे

ऑनलाइन लोकमत
डेहणे, दि. २४ -  धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसात होत असलेल्या पावसाने टोकावडे येथे कळमजादºयात मारुती मोरमारे यांच्या शेतात भूस्खलन होऊन बांधणीचा मोठा भाग वाहून गेला आहे. शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने दगड उघडे पडले आहेत. ५०-६० हेक्टर भातशेतीत दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. हातचे पीक गेलेच; पण जमीनही वाहून गेल्याने बाधित सर्व शेतकरी संकटात आहेत. शेजारच्या धुवोली गावात तर डोंगराच्या माथ्यापासून गावाच्या पायथ्यापर्यंत असलेली संपूर्ण झोळच वाहून गेली आहे. २०-२५ शेतकºयांच्या जमिनीत राडारोडा वाहून आल्याने भातशेती गाडून गेली आहे. 
हीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये आहे. 
पावसाने भातपिकाला फटका बसला आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला असतानाही कृषी व महसूल विभाग माहिती असूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तलाठी, सर्कल आदेशासाठी अडून बसले आहेत. शेतकरी मात्र या अधिकाºयांपुढे हतबल झाला आहे. नुकसानभरपाई देण्याची तयारी दूरच; पण पंचनामा करून दिलासा देण्यासाठी ना अधिकारी आले ना लोकप्रतिनिधी. या वर्षी पीक गेलेच, पण जमिनीचेही अतोनात नुकसान झाल्याने  दुरुस्त करून घेणे शक्य नाही. त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
‘भीमाशंकर येथे नियोजन आणि सततचा पाऊस यामुळे पंचनामे करण्यास विलंब होत आहे. परंतु दोन-तीन दिवसांत पंचनामे करण्याचे काम सुरू होईल. तसे आदेश दिले आहेत.’
  - सुनील जोशी, तहसीलदार, खेड.