शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना आता भाजीपाला पीक व्यवस्थापनाचे धडे!

By admin | Updated: September 20, 2015 22:47 IST

विदर्भातील कृषी विज्ञान केंद्र सरसावले असून शेतक-यांना भाजीपाला पीक व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहे.

अकोला : पारंपरिक पिकासोबतच शेतकरी नवे पीक प्रयोग करीत असून, वेगवेगळ्य़ा पिकांचे प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. यासाठीच कृषी विद्यापीठांनी वेगवेगळ्य़ा पिकांचे व्यवस्थापन व पेरणीतंत्राचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. शासनाने या प्रशिक्षण प्रकल्पाला राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने भाजीपाला पीक व्यवस्थापनासाठी शेतकर्‍यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकर्‍यांची मागणी व गरज लक्षात घेऊन साकोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकर्‍यांना भाजीपाला पीक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. भाजीपाला, वांगे, टोमॅटो, काकडी, कारले, दोडकी, चवळी, मिरची, भेंडी, या अनेक भाजीवर्गीय पिकांची बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, ओलित, तण व्यवस्थापन कसे करावे, यासाठी शेतकर्‍यांचे वर्ग घेतले जात आहेत. भाजीपाला पिकावर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्या किडीची ओळख, किडींचा जीवनक्रम आणि नियंत्रणाचे उपाय, या विषयावर शेतकर्‍यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पीके घ्यावीत, यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, सेंद्रिय भाजीपाला व पीक संरक्षण कसे करावे, हे समजावून सांगितले जात आहे. शासनाने शेती व उद्यानविद्या शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला दिला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोत्पादन केले जाणार आहे. विदर्भात आमच्या कृषी विज्ञान केंद्रातून शेतकर्‍यांना शेतीशी निगडित माहिती दिली जात असून, वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. भाजीपाला संवेदनशील पीक असल्याने शेतकर्‍यांना या पिकांची काढणी ते बाजारपेठ आदींची सूक्ष्म माहिती व्हावी, म्हणून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सध्या साकोली कृषी विज्ञान केंद्रातर्फे दोन दिवस मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी सांगीतले.