ख्यातनाम संगीतकार आनंद मोडक कालवश

By Admin | Updated: May 23, 2014 14:45 IST2014-05-23T14:26:48+5:302014-05-23T14:45:36+5:30

एक होता विदूषक, चौकट राजा, हरिशचंद्राची फॅक्टरी अशा चित्रपटांमधील दर्जेदार संगीताद्वारे मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे संगीतकार आनंद मोडक यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.

Famous musician Anand Modak Kalwesh | ख्यातनाम संगीतकार आनंद मोडक कालवश

ख्यातनाम संगीतकार आनंद मोडक कालवश

>ऑनलाइन टीम
पुणे, दि. २३ - एक होता विदूषक, चौकट राजा, हरिशचंद्राची फॅक्टरी अशा चित्रपटांमधील दर्जेदार संगीताद्वारे मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे संगीतकार आनंद मोडक यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. पुणे येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने  त्यांचे निधन झाले.  
अकोला येथील ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या आनंद मोडक यांनी त्यांच्या संगीताने मराठीच नव्हे तर हिंदी संगीत जगतात नाव कमावले. घांशीराम कोतवाल या नाटकाच्या संगीताद्वारे त्यांनी कारकिर्दीचा शुभारंभ केला होता.  महानिर्वाण, तीन पैशांचा तमाशा, पडघम या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले.तर चौकट राजा, एक होता विदूषक, मुक्ता, तू तिथे मी, कळत - नकळत, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांमधील गाण्यांना मोडक यांनी संगीतबद्ध केले होते. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले होते. नुकताच प्रदर्शित झालेल्या यशवंतराव चव्हाण या चित्रपटालाही मोडक यांनी संगीत दिले होते. 
गुरुवारी संध्याकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने आनंद मोडक यांना रुग्णालयात दाखल करण्याता आले होते. मात्र शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मोडक यांच्या निधनाने धक्का बसला असून मराठी संगीताचे मोठे नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया गायिका बेला शेंडे यांनी दिली आहे. तर ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनीदेखील मोडक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अष्टपैलू, संगीताची जाण असलेला प्रयोगशील संगीतकार हरपला असे पटेल यांनी सांगितले. 

Web Title: Famous musician Anand Modak Kalwesh