शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक पात्रतेची खोटी माहिती; स्मृती इराणी अडचणीत येणार

By admin | Updated: May 31, 2014 23:06 IST

इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेपुरताच मर्यादित नाही तर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी तीन वेळा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत घेतलेल्या परस्पर विसंगत भूमिकेशी निगडित आहे.

फराज अहमद - नवी दिल्ली
शैक्षणिक पात्रतेशी संबंधित दस्तऐवज फोडणा:या दिल्ली विद्यापीठाच्या कर्मचा:यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केंद्रीय मनुष्य बळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलेली असली तरी 2क्क्4, 2क्11 आणि 2क्14 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रतील विसंगतीमुळे त्यांची राजकीय पंचाईत होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा केवळ इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेपुरताच मर्यादित नाही तर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी तीन वेळा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत घेतलेल्या परस्पर विसंगत भूमिकेशी निगडित आहे.
या मुद्यावर आम्ही स्वत:हून स्मृती इराणी यांच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. परंतु अन्य कुणालाही पुढे येऊन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल इराणी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करता येऊ शकेल. खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपात जास्तीतजास्त सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ सूत्रंनी लोकमतला सांगितले.
खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल इराणी यांना सहा महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो.   त्यांना तुरुंगवास झाला तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व कायम राहील आणि त्यांना अपात्र ठरविले जाणार नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
एखाद्या लोकसभा सदस्याला दोन वषापेक्षा कमी शिक्षा झाल्यास त्याला अपात्र ठरविता येत नाही, असे कायदा सांगतो.
 
-स्मृती इराणी यांनी 2क्11 च्या राज्यसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रत, आपली शैक्षणिक पात्रता ‘बी. कॉम. पार्ट 1, स्कूल ऑफ करस्पाँडन्ट कोर्स, दिल्ली विद्यापीठ, 1994’ असल्याचे नमूद केले होते. त्या आधी 2क्क्4 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी, दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ करस्पाँडन्टमधून 1996 मध्ये बी. ए. झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर 2क्14 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची शैक्षणिक पात्रता पुन्हा बदलली. यावेळी त्यांनी पुन्हा बी. कॉम. पार्ट 1 असे नमूद केले.
-विशेष म्हणजे हे तिन्ही प्रतिज्ञापत्र त्यांनी शपथेवर लिहून दिलेले आहेत. आता या विसंगत प्रतिज्ञापत्रवर भाजपा आणि रालोआ काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.