शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जाती प्रमाणपत्र तपासणीला मुदतवाढ

By admin | Updated: June 22, 2014 00:55 IST

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मुदतीत जाती प्रमाणपत्र

जाती पडताळणी समिती : ३० जूनपर्यंत मुदतवाढ नागपूर : सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मुदतीत जाती प्रमाणपत्र तपासण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही. परंतु २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय,अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्र्र मासाठी प्रवेश घेऊ इच्छितात. अशा विद्यार्थ्यांच्या जाती प्रमाणपत्र तपासणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्यासाठी आपले अर्ज संबंधित महाविद्यालयामार्फत संंस्थेच्या प्राचार्याकडे ३० जून २०१४ पर्यत सादर करावयाचे आहेत. शैक्षणिक संस्थेने असे प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे ७ जुलै २०१४ पर्यंत सादर करावे. सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी १५ जुलै २०१४ पर्यंत विभागीय जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करावे. समितीने सर्व अर्ज तपासून देण्याची अंतिम तारीख ३०सप्टेंबर २०१४ आहे. विद्यार्थ्यांनी जाती पडताळणीकरीता संबंधित महाविद्यालयास अर्ज सादर करताना जातीसंबंधीचे आवश्यक ते सर्व शैक्षणिक तसेच महसुली पुरावे जाडावे. तसेच इयत्ता १२ वी ची गुणपत्रिका, वरील अभ्यासक्र मास प्रवेश मिळाल्यास पुरावा (बोनाफाईड सर्टिफिकेट ंिकंवा वरील अभ्यासक्र मासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र) सादर करावे. असे आवाहन जाती पडताळणी समिती क्र. ३ चे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी केले आहे.वाढीव मुदतीत अर्ज फक्त १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे व जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्र मास प्रवेश घेऊ इच्छितात व त्या संदर्भात आवश्यक पुरावा जोडला आहे, त्यांचेच अर्ज स्वीक ारले जातील. तसेच २०१४-१५ मध्ये १२ वीत शिकणारे व मार्च २०१५ मध्ये १२ वी ची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज १ आॅगस्ट २ ०१४ पासून स्वीकारले जाणार आहे. तूर्त १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी सादर करू नये, असे आवाहन पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)