शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस वेवर बसची डम्परला धडक

By admin | Updated: September 23, 2015 01:37 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताला काही तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत

खालापूर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी झालेल्या भीषण अपघाताला काही तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत असलेल्या रिकाम्या डम्परला तेलंगणा राज्य परिवहन मंडळाची बस धडकून झालेल्या अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर बस डम्परमध्ये अडकली होती. एक्स्प्रेस वेवर सुरक्षेचे नियमच पाळले जात नसल्याचे या अपघातानंतर समोर आले आहे.तेलंगणा राज्य परिवहन मंडळाची (एपी २९-२-३४२९) बस मुंबईतून तेलंगणातील मेहबूब नगर येथे जात होती. खालापूर टोलनाका पास केल्यानंतर खोपोली एक्झिटजवळ उलट दिशेने येत असलेला डम्पर (एमएच ४६ एफ ०३३६), बस चालकाला न दिसल्याने भरधाव वेगातील बस डम्परला धडकली. या अपघातात बसचा चालक पद्मनाभन, कंडक्टर वेकंटय्या, अर्शद शेख, बाळासाहेब पाटील हे व ट्रकचा क्लीनर अतुल साहुबाव दाते हे किरकोळ जखमी झाले. डम्परला धडकल्याने बसची डावी बाजू कापली गेली. सुदैवाने या अपघातातून मोठी जीवितहानी टळली. सोमवारी झालेल्या अपघातातही क्वॉलीस डम्परला जाऊन धडकली होती. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताची माहिती मिळताच खोपोलीचे पोलीस निरीक्षक जयसिंह तांबे व महामार्ग विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते.एक्स्प्रेस वेवरील प्रवास धोकादायक असल्याचे मंगळवारी झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात वाहने धावत असताना उलट दिशेने डम्पर आलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. एक्स्प्रेस वेवर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अनेकदा ही वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. एक्स्प्रेस वेवर खाजगी प्रवासी बस व अन्य वाहने खुलेआम प्रवासी घेत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे. यामुळे मोठ्या अपघाताची भीती असल्याने अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.