दोन मुलींवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न

By Admin | Updated: September 23, 2015 01:03 IST2015-09-23T01:03:35+5:302015-09-23T01:03:35+5:30

पांढुर्णा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व मुलींचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर दोन विद्यार्थिनींवर चौकीदाराने लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे

Execution of two girls atrocities | दोन मुलींवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न

दोन मुलींवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न

वर्धा : पांढुर्णा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व मुलींचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर दोन विद्यार्थिनींवर चौकीदाराने लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस कोठडी दरम्यान, आरोपी राजू लांडगे याला उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी आश्रमशाळेतील घटनास्थळी नेऊनत्याची विचारपूस केली. आरोपी समक्ष विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविण्यात आले. मुलींकडून आरोपीच्या विकृतीच्या घटना पुढे आल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. यातूनच दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही उघड झाले. (प्रतिनिधी)
पांढुर्णा आदिवासी आश्रमशाळेत पालकांनी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी नक्कीच ठेवावे, आता अशी काहीही घटना होणार नाही. नवीन अधीक्षक, अधीक्षिका, मुख्याध्यापक यांना सक्त ताकीद दिली आहे. आता भीतीचे वातावरण नाही.
- हरिराम मडावी, प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प विभाग, नागपूर

Web Title: Execution of two girls atrocities