शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात साजरा होणार ‘उद्योग दिन’

By admin | Updated: January 27, 2015 23:41 IST

विश्‍वकर्मा जयंती दिनी आयोजन; एका व्यासपीठावर येणार अवघे उद्योग जगत.

अकोला: राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यात उद्योग दिन साजरा करण्याचा निर्णय, राज्याच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने घेतला आहे. मंगळ्वार, दिनांक २७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, उद्योग जगताला एका व्यासपीठावर आणण्यासाठी, विश्‍वकर्मा जयंती दिनी विविध कार्यक्रम व प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने २0१३ मध्ये जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणानुसार, राज्याचा औद्योगिक विकास घडवून, आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांना, त्यांची उत्पादने व क्षमतांचे प्रदर्शन घडविता यावे यासाठी, सामाईक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शानसाने घेतला आहे. प्रत्येक जिल्यात असे व्यासपीठ वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी विश्‍वकर्मा जयंती दिनी प्रत्येक जिल्ह्यात उद्योग दिन साजरा करण्याचे निर्देश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिले आहेत. *जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीउद्योग दिनाचे आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर उद्योग दिनाचे नियोजन, समन्वय व सनियंत्रण करण्यासाठी उप समिती गठित करतील. *राज्य शासन देणार निधीउद्योग दिनाचे आयोजन करण्यासाठी आणि जिल्हा पातळीवरील पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकडून आयोजनानुसार निधीची मागणी करण्यात आल्यानंतर, निधी उपलब्ध करून दिला जाईल.