शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरची पोरं सर्वेक्षणानंतरही शालाबाह्यच

By admin | Updated: October 30, 2015 00:31 IST

पोरांली शिकवण्याची लय इच्छा हाय; पण येथे पोटाची रोजची खळगी भरणंच कठीण... रस्त्यावर फुगं, खेळणी ईकून शे-दीडशे रुपये मिळतात... पोरं बी तेच करतात...

पुणे: पोरांली शिकवण्याची लय इच्छा हाय; पण येथे पोटाची रोजची खळगी भरणंच कठीण... रस्त्यावर फुगं, खेळणी ईकून शे-दीडशे रुपये मिळतात... पोरं बी तेच करतात... शासनाने सर्वे केल्यानंतर वाटलं होतं आता आपली पोरं शाळेत जातील, पर सर्वे होऊन चार महिने झाले... पोरांली शाळेत घ्यायाला कोणी फिरकलंच नाही... मग्ां काय पोरं पुन्हा रस्त्यावरच आमच्यासोबत फुगे इकत्यात... रस्त्यावरच्या पोरांच्या नशिबी कसली आली शाळा नी काय.. ही उद्िवग्न प्रतिक्रिया आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून पुणे शहरात आलेल्या गणपत लक्ष्मण पवार या पालकाची.. गणपत पवार यांना दोन मुले व एक मुलगी आहे. विशी-पंचविशीत असलेल्या या तरुणाला आपल्या मुलांना शिकवण्याची खूप इच्छा आहे. पण परिस्थितीपुढे हतबल असल्याने मुलांना शिकवू शकत नाही. शासनाच्या वतीने जुलै महिन्यात करण्यात आलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात हजारो मुले शालाबाह्य असल्याचे समोर आले. पण या सर्व्हेनंतर या मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.गाजावाजा करून शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले खरे; पण सरकारी यंत्रणेच्या मानसिकतेप्रमाणे केवळ कागदोपत्रीच शंभर टक्के सर्वेक्षण करण्यात आले. अद्यापही हजारो मुले शालाबाह्य असून, शासनाच्या सर्वेक्षणात त्याचा समावेश नाही. सर्वेक्षण झाल्यानंतर शालाबाह्य असणाऱ्या मुलांना शाळेत दाखल करून घेणे अपेक्षित होते; पण शासन केवळ टाइमपास करत असून, गरीब, असहाय मुलांच्या भावनांशी खेळ करत आहे. - बस्तु रेगे, दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे कार्यकर्ते शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणानंतर त्वरितच सर्व संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना त्या-त्या परिसरातील मुलांना लगतच्या शाळेत दाखल करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे.-दिनकर टेमकर (शिक्षण उपसंचालक)