शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र मुस्लिम मंचची मुंबईत स्थापना

By admin | Updated: May 30, 2014 23:57 IST

मुस्लिम समाजात जागृती निर्माण करून समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काही प्रमुख मुस्लिम सामाजिक संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम मंचची स्थापना केली आहे

मुंबई : मुस्लिम समाजात जागृती निर्माण करून समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी काही प्रमुख मुस्लिम सामाजिक संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम मंचची स्थापना केली आहे. मुंबईतील इस्लामिक जिमखाना येथे मंगळवारी मुस्लिम समाजासाठी काम करणार्‍या प्रमुख संघटना आणि विचारवंतांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मंचचे मुख्य संयोजक एफ.एम.ठाकूर यांनी सांगितले.याआधी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य विकासाशी संबंधित मागण्यांसाठी काम करणार्‍या विविध संघटनांना एकाच छताखाली चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. शिवाय संघटना आणि विचारवंतांना काम करताना भेडसावणार्‍या अडचणींवर उहापोह करण्यात आला. त्यावेळी काही सामाईक अडचणी समोर आल्या. त्यात कार्यकर्त्यांचे संख्याबळ आणि आर्थिक चणचण या दोन अडचणींचा समावेश होता. परिणामी वेगवेगळे राहून काम करण्यापेक्षा प्रत्येक संघटनेने स्वत:चे नाव बाजूला ठेवून एकत्र येऊन लढण्यासाठी मंचची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.आतापर्यंत मुख्य शहरातील काही संघटना मंचात सामील झाल्या आहेत. मात्र राज्यभर काम करणार्‍या संघटनांना एकत्र आणण्यासाठी मंचाची भुमिका राज्यस्तरावर पोहोचवण्यासाठी मंचातर्फे राज्यभर मेळावे घेण्यात येणार आहेत. राज्यातील पहिला मेळावा सोलापूर येथे सोमवारी ९ जून रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक संघटना मंचमध्ये सामील होतील, अशी आशा ठाकूर यांनी व्यक्त केली.मंचच्या काही प्रमुख मागण्यामहम्मद रहेमान कमिटीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. अंमलबजावणी करण्याआधी अहवाल प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात यावा.अहवाल प्रसिद्ध करताना त्यात सच्चर कमिटीने सुचविलेल्या शिफारशींचा विचार करण्यात यावा..............