शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Video: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान
4
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
5
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
6
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
7
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
8
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
9
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
10
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
11
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
12
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
13
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
14
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
15
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
16
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
17
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
18
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
19
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
20
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न

By admin | Updated: September 13, 2014 12:31 IST

बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, इंदिरानगर भागातील मोहसीन शेख हा संगम चौकातील एका मोबाईल फोनच्या दुकानात कामाला आहे

बुलडाणा : लव्ह जिहादच्या मुद्यावर देशभरात वादळ सुरू असताना, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बुलडाणा पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, इंदिरानगर भागातील मोहसीन शेख हा संगम चौकातील एका मोबाईल फोनच्या दुकानात कामाला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी या दुकानावर तिचा मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी जायची. त्यामुळे मोहसीनला तिचा मोबाईल फोन नंबर सहजच मिळाला. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधून, मैत्री केली. कालांतराने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार जून महिन्याच्या अखेरीस घडला होता. दरम्यान, २८ जून रोजी विद्यार्थिनीच्या वडिलांनी बुलडाणा पोलिसांकडे मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती; परंतु, तत्पूर्वी मोहसिनने विद्यार्थिनीला भिवंडी येथे बहिणीच्या घरी नेले होते. तिथे आपले धर्मांतर करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असल्याचा आरोप युवतीने केला आहे.आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस या विद्यार्थिनीने मुंबईतील भिवंडी येथील एका पोलीस कॉन्स्टेबलची भेट घेऊन त्याला आपबिती कथन केली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांने २५ आॅगस्टला तिला बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ११ सप्टेंबरला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये मोहसीन शेख, आई मेहरूनिस्सा शेख, सलीम खान, शाहिस्ता शेख यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)