शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताची समाप्ती अर्ध्यावरच!

By admin | Updated: August 16, 2014 01:58 IST

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर वाशिम येथे जिल्हा सैनिक कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला

नंदकिशोर नारे, वाशिमस्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर वाशिम येथे जिल्हा सैनिक कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. जनसामान्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये दस्तुरखुद्द जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीच राष्ट्रगीत विसरले. शेकडो वाशिमवासीयांच्या साक्षीने या कार्यक्रमात एवढा गोंधळ उडाला की, राष्ट्रगीत अर्ध्यावरच सोडावे लागले.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका ते जिल्हा क्रीडा संकुल मैदानापर्यंत ‘माँ तुझे सलाम’ या ऋणानुबंध व जनजागरण रॅली गुरुवारी काढण्यात आली़ नगर परिषदेच्या प्रांगणात सकाळी ९ वाजता झालेल्या रॅलीचा उद्घाटन सोहळा झाला़ कार्यक्रमात प्रारंभी अपर जिल्हाधिकारी एस. बी. राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर स्काऊट गाइडच्या बँड पथकाने राष्ट्रगीतास सुरुवात केली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव यांनी ध्वनिक्षेपक हातात घेऊन बँड पथकाच्या तालावर राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली; मात्र ते राष्ट्रगीताची केवळ सुरुवातच करू शकले. जन गण मन... या तीन शब्दांच्या पुढे त्यांची गाडीच सरकत नव्हती. यामुळे बँड पथकाचीही पंचाईत झाली. या प्रकारामुळे गोंधळलेल्या जाधव यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. ध्वनिक्षेपक व्यवस्थित पकडून त्यांनी पुन्हा राष्ट्रगीत सुरू केले; परंतु या वेळीही त्यांची गाडी काही केल्या ‘जन गण मन’ यापुढे सरकण्यास तयार नव्हती. जाधव यांच्या या विस्मरणाने बँडपथक गोंधळले. सैनिक कार्यालयातील कर्मचारी एस. व्ही. देशपांडे यांनी लगेच माइक हातात घेऊन झालेला गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही राष्ट्रगीत म्हणता आले नाही. राष्ट्रगीत म्हणताना तेही अडकल्याने गोंधळ आणखी वाढला. अखेर देशपांडे यांनाही राष्ट्रगीत येत नसल्याचे पाहून, राष्ट्रगिताची अर्ध्यावरच समाप्ती केली.