शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:32 PM

एल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा राज्याला अधिकार- पवार

ठळक मुद्देएल्गार आणि कोरेगाव-भीमा वेगळी प्रकरणं- शरद पवारएल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा राज्य सरकारला अधिकार- शरद पवारमागच्या सरकारनं काय केलं, ते जनतेसमोर यायला हवं- शरद पवार

मुंबई: एल्गार परिषद प्रकरणात अनेकांना विनाकारण गोवण्यात आलं आहे. तिथं उपस्थित नसलेल्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले. मागच्या सरकारनं त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. यात त्यांना काही पोलिसांनीदेखील साथ दिली. त्यामुळे या प्रकरणात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायलाच हवी. तसा अधिकार राज्य सरकारला आहे. एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारला देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं समांतर चौकशीची भूमिका घेतली. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारित स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एल्गार प्रकरणावर भाष्य केलं. कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमाशी संबंध जोडण्यात आला. त्या परिषदेला हजर नसलेल्या लोकांना या प्रकरणात अडकवण्यात आलं. त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. यात काही पोलिसांचाही हात होता. काही सरकारी अधिकारीदेखील यात सहभागी होते, त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असा आमचा आग्रह आहे. तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील,' असं पवार म्हणाले. आजच्या महत्त्वाच्या बातम्याशिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधानमेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरूडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेशChina Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाSharad Pawarशरद पवारBJPभाजपाBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार