शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

एल्गार परिषद प्रकरण: शरद पवार यांना लवकरच समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 2:52 AM

एप्रिलमध्ये साक्ष होण्याची शक्यता

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेतील वक्ते व कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी पूर्वग्रहदूषित कारवाई केल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्याबाबत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून लवकरच समन्स पाठविले जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साक्षीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण दंगलप्रकरणाची चौकशी निवृत्त न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून सुरू आहे. त्याची मुदत ८ एप्रिलपर्यंत असून त्यानंतर त्यांनी सरकारला अहवाल सादर करावयाचा आहे. शरद पवार यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे वर्ग केल्याने राज्य सरकार व केंद्रामध्ये वाद निर्माण झाले होते. त्यानंतर पवार यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार पुणे पोलिसांनी निरपराधांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप केला होता.उजव्या विचारसरणीच्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्या चिथावणीमुळे दंगल घडल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे विवेक विचार मंच या सामाजिक गटाचे सदस्य सागर शिंदे यांनी पवार यांची साक्ष घेण्याबाबत आयोगासमोर अर्ज दाखल केला होता. न्या. पटेल यांनी तो मान्य केला. त्यात बाजू मांडत असलेल्या अ‍ॅड. आशिष सातपुते यांनी सांगितले की, आयोगाने त्यांना साक्षीस हजर राहण्यासाठी लवकरच समन्स पाठवण्याचे मान्य केले आहे. आयोगाची मुदत संपण्यापूर्वी त्यांना बोलावले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाSharad Pawarशरद पवार