अकरावी प्रवेश आता सीईटीच्या आधारावर; विद्यार्थ्यांची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 11:28 AM2021-07-17T11:28:35+5:302021-07-17T11:30:28+5:30

दहावी निकालानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते.

Eleventh admission now on the basis of CET; Students begin preparation | अकरावी प्रवेश आता सीईटीच्या आधारावर; विद्यार्थ्यांची तयारी सुरू

अकरावी प्रवेश आता सीईटीच्या आधारावर; विद्यार्थ्यांची तयारी सुरू

googlenewsNext

मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासावर आधारित सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही सीईटी परीक्षा ऐच्छिक असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत त्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दहावी निकालानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, वेळापत्रकाबाबतची स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली घेतली जाणार असून, परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून ३ लाख २० हजार ७७९ जागा उपलब्ध होत्या. त्यातीलही ७६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. राज्यात दहावी उत्तीर्णांची संख्या १६ लाख असली तरी अकरावी प्रवेशाची क्षमता ही निश्चितच जास्त आहे. मागील वर्षी अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

सर्वच मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे कटऑफ वाढणार आहेत. मुलांना चांगले गुण मिळाले की, नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा लागते, ही स्पर्धा यावेळी मोठ्या प्रमाणात होईल, असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Eleventh admission now on the basis of CET; Students begin preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.