शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:34 IST

२ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल, थेट लोकांमधून निवडले जाणार २८८ नगराध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक करत असतानाच मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी (एकूण २८८) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामुळे आता सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

दुबार नावांबाबत काय करणार?

राज्य निवडणूक आयोगाने टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टारचे (**) चिन्ह लावले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याविषयी त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. 

दुबार मतदाराची काटेकोर ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. तसेच दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असे हमीपत्रही त्याच्याकडून घेतले जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. मात्र, संभाव्य दुबार मतदाराची नेमकी संख्या सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. 

३१ जानेवारीपूर्वीच पार पडणार सर्व स्थानिक निवडणुका 

विरोधक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याबाबत विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही निवडणुका घेत असून, न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकाही ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे नियोजन आयोगाने केल्याचे स्पष्ट होते.

व्हीव्हीपॅटचा वापर नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याबाबत नियमात तरतूद नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बहुप्रभाग पद्धतीने होणार आहे. मतदारांना एकापेक्षा जास्त वेळ मतदान करावे लागणार आहे. तांत्रिकदृष्ट्याही व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Local Body Elections Announced: 246 Councils, 42 Panchayats Polling

Web Summary : Maharashtra State Election Commission declared elections for 246 Nagar Parishads and 42 Nagar Panchayats. Polling for member and president posts is on December 2nd; counting on December 3rd. The model code of conduct is now in effect. Duplicate voters will be identified, and elections must conclude by January 31st.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्र