शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या बापाने मुलाला विकले

By admin | Updated: June 22, 2014 00:52 IST

पैशाच्या लालसेपोटी बापाने आपल्या मुलाला केवळ १० हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. मुलाला परप्रांतात विकणारा बाप अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून

अमरावती जिल्ह्यातील घटना : १० हजार रुपयांमध्ये केला सौदाअमृत काशीकर - पिंपरीपूर्णापैशाच्या लालसेपोटी बापाने आपल्या मुलाला केवळ १० हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. मुलाला परप्रांतात विकणारा बाप अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.पिंपरीपूर्णा येथील अनिता तुळशीराम गुळधे हिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर काळबांडे याचेशी झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली. त्यानंतर शंकरने अनिताला दारू पिऊन त्रास देणे सुरु केले होते. परंतु याबाबत अनिताने कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे तिला होणारा त्रास वाढतच गेला. शेवटी यातना असह्य झाल्याने अनिता शंकरला सोडून दोन मुलांसह माहेरी परत आली. दरम्यान वर्षभरापूर्वी शंकरने त्याचा मुलगा सुरज शंकर काळबांडे (१४) याला कावेबाजपणे स्वत:सोबत अमरावती येथे आणले. चार ते पाच दिवस सोबत ठेवून त्याने सूरजला थेट बिहार प्रांतातील पटना येथे नेले. तेथील ढाब्याच्या मालकाकडून १० हजार रूपये घेऊन मुलाला तेथेच सोडून त्याने पळ काढला. सूरजने त्याठिकाणी काही दिवस काम करुन सूरज ढाबामालकाची नजर चुकवून पळाला. त्याने थेट पटना रेल्वे स्टेशन गाठले. परंतु रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी सूरजला पकडले. त्याला पटना येथील अनाथालयात आणण्यात आले. तेथे सूरज एक वर्षपर्यंत राहिला. सूरजने दिलेल्या पत्त्याच्या आाधारे पटना पोलिसांनी चांदूूरबाजार पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर चांदूरबाजार पोलिसांनी पिंपरी येथे मुलाच्या आईला माहिती कळविली. सूरजची आई अनिता काळबांडे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही पटना येथील अनाथालय गाठले. तेथील अधीक्षकांची भेट घेऊन तिने सूरजला ताब्यात घेतले. ३ जून रोजी आई व मुलगा त्यांच्या गावी परत आले. याप्रकरणी पोलिसांनी शंकर काळबांडे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असणाऱ्या असून ठाणेदार दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात त्याचा शोध सुरू आहे.