शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंना चार दिवसांत दुसरा धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळले, अजित पवारांना घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:41 IST

काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलविलेल्या बैठकांना दांडी मारली होती, शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत. अशातच महायुतीत काहीतरी सुरु असल्याच्या घडामोडींवर चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ  सनदी अधिकाऱ्याकडे सोपविली होती.

महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची वृत्ते येत आहेत. आपल्या नेतृत्वात राज्यात पुन्हा सत्ता आली, यामुळे काही काळ मुख्यमंत्री पदी राहुद्या, असे म्हणणारे शिंदे हळूहळू देवेंद्र फ़डणवीसांपासून लांब जाऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलविलेल्या बैठकांना दांडी मारली होती, शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत. अशातच महायुतीत काहीतरी सुरु असल्याच्या घडामोडींवर चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ  सनदी अधिकाऱ्याकडे सोपविली होती. हा शिंदेंना धक्का असल्याचे मानले जात असतानाच आता आणखी एक धक्का शिंदे गटाला देण्यात आला आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सुत्रे आपल्याकडे घेतली असून या समितीत अजित पवारांची वर्णी लागली आहे. महसूल,मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत. मात्र नगरविकासचे मंत्री शिंदे नाहीत, यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. 

अशातच लाडक्या बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आता लाडक्या बहीणांच्या यादीवरच कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहे. 

राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडू लागला आहे. यामुळे 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' आणि तीर्थदर्शन योजना या बंद करण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आले आहे. यापैकी दोन योजना या शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजना होत्या. एकीकडे या योजना बंद होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना या योजना बंद होणार नसल्याचा दावा शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या योजनांचा खूपच कमी खर्च आहे, यामुळे याचा परिणाम आर्थिक गोष्टींवर होईल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत काय झाले हे माहिती नसल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार