शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:47 IST

Eknath Shinde PC: शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतू, त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचे वक्तव्य केलेले नाही. तसेच उद्या महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीला जाणार, बैठक घेणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

शिंदे काय म्हणाले...गेल्या अडीच वर्षांत भाजपा आणि केंद्र सरकारने खूप पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या काळात बंद झालेल्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ यांसह अनेक योजना राबवल्या. यशस्वी केल्या. सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४