शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 08:15 IST

Deputy CM Eknath Shinde News: विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा संकल्प करूया, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Deputy CM Eknath Shinde News:पारनेर तालुक्यात आज शिवसेनेचा जाहीर मेळावा उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी तब्बल २५ सरपंच, अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “पारनेरच्या विकासाची जबाबदारी माझीच आहे” असे सांगत झावरे पाटील यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुजित झावरे पाटील यांच्या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे. त्यांनी समाजकारणातून आणि जनतेच्या विश्वासातून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याकडे धनादेश नसला तरी जनादेश आहे, असे शिंदे यांनी गौरवोद्गार काढले. मेळाव्यात शिंदे यांनी निवडणुकीचा संकल्प मांडला की, लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण जिंकल्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवण्याचा संकल्प करूया. पारनेरपासून राज्यभर भगवा फडकवू.

लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असावा, स्थगिती देणारा नसावा

सुजित पाटील हे प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेते आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी पंचायत समितीचे सभापती, आणि २८ व्या वर्षी सर्वात तरुण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचा विकास वेगाने होईल. त्यांच्या पाठीशी माझे आणि शिवसेनेचे संपूर्ण बळ आहे. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असावा, स्थगिती देणारा नसावा. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी स्थगिती सरकार पाहिले, पण आता स्पीड ब्रेकर काढून विकासाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असे शिंदे म्हणाले.

मी ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’

पारनेर तालुक्यातील मनरेगा निधी वाढवण्याचे निर्देश मी भरत गोगावले यांना देणार आहे. तसेच पारनेर पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तत्काळ मंजूर केला जाईल. नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. शिंदे यांनी भाषणात ‘लाडकी बहीण योजना’ या जनकल्याणकारी उपक्रमावरही भाष्य केले. ते म्हणाले की, या योजनेबद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे, आणि मी ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहे. या राज्यातील  अडिज कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच माझी खरी ओळख आहे. त्यांनी पुढे विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, ज्यांनी विकास प्रकल्पांना स्पीड ब्रेकर टाकले, त्यांनाच जनतेने फेकून दिले. आम्ही सत्ता सोडून गेलो, पण जनतेने आम्हाला पुन्हा स्वीकारले. महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आमच्यावर आहे.

शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमचा टॉनिक

शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमचा टॉनिक आहे. शिवसेना ही कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पक्षसंस्था आहे. जो काम करेल तो पुढे जाईल, मागण्याची गरज नाही. या वेळी शिंदे यांनी सुजित झावरे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तुमच्या घरात सत्ता ही नवी नाही, पण तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि जनतेच्या प्रेमामुळे तुम्ही आज योग्य घरात म्हणजे शिवसेनेत  दाखल झाला आहात. आता धनुष्यबाण हातात आहे, योग्य दिशेने लक्ष्य साधा, बाकी सर्व जबाबदारी माझी, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde Gains Ground: Ajit Pawar's Men Join Shiv Sena

Web Summary : Eknath Shinde welcomed Sujit Zaware Patil, along with 25 Sarpanchs and supporters, into Shiv Sena. Shinde promised development for Parner, praising Patil's leadership and public trust. He emphasized his commitment to the common man and continuous development, dismissing opposition as hindering progress.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसParnerपारनेर