शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेस विवस्त्र केले

By admin | Updated: May 10, 2014 23:01 IST

छत्तीसगडमधील जशपूर जिल्हय़ातील पठालगाव भागात गाव पंचायतीने एका ३५ वर्षीय आदिवासी शिक्षिकेला सर्वांसमोर विवस्त्र केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

रायपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्हय़ातील पठालगाव भागात गाव पंचायतीने एका ३५ वर्षीय आदिवासी शिक्षिकेला सर्वांसमोर विवस्त्र केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गावाच्या बहिष्कारापासून वाचायचे असल्यास एक लाख रुपयांचा                  दंड भरण्याचेही तिला सांगण्यात  आले.
पीडितेने आयोगासमक्ष आपल्यावर ओढवलेल्या प्रसंग सांगितला. पीडित महिलेच्या भाचाचे (भावाचा मुलगा) गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. दोघेही एकाच जातीचे असून लग्न करू इच्छित होते. दोघांच्याही लग्नाची बोलणी सुरू असताना सदर विवाहेच्छुक मुलगी काही दिवस पीडित शिक्षिकेच्या घरी राहिली. तिचा भाचाही तिच्या घरी राहिला. 
गावातील सरपंच नेहरू लकडा यांना हे कळताच त्यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि पीडित मुलीकडून वाईट कृत्य करवून घेत असल्याचा आरोप केला. 
हा वाद १९ एप्रिल रोजी ग्रामसभेसमोर पोहोचला.
दबावाखाली सदर मुलीने पीडितेच्या भाच्यासोबत कुठलेही संबंध असल्याचा इन्कार केला. यामुळे पीडित शिक्षिकेला दोषी ठरवून सरपंचाने तिला व तिच्या नातेवाइकांना गावातून बहिष्कृत केले. बहिष्कृत व्हायचे नसेल तर सर्वांसमोर विवस्त्र होऊन एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे तिला फर्मावण्यात आले. तिने यास नकार दिल्यावर पंचायतीने तिला मारहाण करून विवस्त्र                  केले.
प्रकरण आयोगापर्यंत गेल्यावर याप्रकरणी पोलिसांनी सरपंच व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटकही करण्यात आली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. 
(वृत्तसंस्था)
 
-भाच्याच्या प्रेमप्रकरणावरून या महिलेचा छळ करण्यात आला. १९ एप्रिलला पठालगावाच्या पाकरगाव भागात ही घटना घडली. अत्याचाराची तक्रार घेऊन पीडित शिक्षिका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली असता पोलिसांनी तिला कुठलीच दाद दिली नाही. 
-पुरावे गोळा करण्याच्या नावावर तिला ताटकळत ठेवण्यात आले.  त्यामुळे या महिलेने मानवाधिकार आयोग व महिला आयोगाकडे धाव घेतली.