शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ई-पंचायतमुळे ग्रामीण भागात बँक सुविधा!

By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात

जिल्हा परिषद : सीएससी सेंटरच्या माध्यमातून गावात २७ सुविधानागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शता यावी, यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँक व अन्य सुविधा उपलब्ध झाली आहे.बँकांच्या शाखा नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. परंतु आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून वित्तीय समावेशन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात शून्य रकमेवर विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे खाते उघडणे शक्य झाले आहे. आर्थिक व्यवहारासोबतच मनरेगावरील मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा केली जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-पंचायतच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. ग्रामस्तरावर २७ प्रकारचे दाखले व अर्जाचे नमुने उपलब्ध होत आहे. सीएससी केंद्र जिल्हा परिषदेतील संग्रामसोबत जोडण्यात आले आहे. केंद्रात शासनाच्या विविध योजनांसोबतच गावातील नागरिकांची माहिती संग्रहित क ेली आहे. सीएससी केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन शॉपिंग, रेल्वे आरक्षण, मोबाईल रिचार्ज, मोबाईल पेमेंट, विविध स्वरूपाचा विमा, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन योजनेचा लाभ, आॅनलाईन प्रशिक्षण, आधार कार्ड अशा स्वरूपांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे. केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना लवकरच ई-न्यायालय, बाजारभावाची माहिती, परीक्षांचे निकाल, हवामान, पेन्शन योजना,विमा योजनांची माहिती उपलब्ध के ली जाणार आहे.ग्रामीण भागातील लोकांनी ई-पंचायत अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)