शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतही ड्रंक अँड ड्राईव्ह, फूटपाथवर झोपलेल्या मायलेकी ठार

By admin | Updated: September 23, 2015 09:20 IST

दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवून इक्बाल शेखने बुधवारी पहाटे फूटपाथवर झोपलेल्या मायलेकींना चिरडल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २३ - दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा खटला चर्चेत असतानाच डोंबिवलीतही असा 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा प्रकार घडला असून त्यात निष्पाप माय-लेकींना जीव गमवावा लागला आहे. दारूच्या नशेत वेगात गाडी चालवणा-या इक्बाल शेख (वय २४) या तरूणाने बुधवारी पहाटे शिवमंदिर परिसरात फूटपाथवर झोपलेल्या मायलेकींना चिरडले. त्यात त्या दोघींचा मृत्यू झाला आहे.
शिवमंदिर परिसरातील गिरनार चौकात आज पहाटे ३.३० च्या सुमारास हा अपघात घडला. दारूच्या नशेत असलेल्या इक्बालच्या इनोव्हा गाडीची धडक समोरून येणा-या स्कोडाला बसली आणि इनोव्हा सरळ फूटपाथवर चढली. तेथे झोपलेली एक महिला ( वय सुारे ४०) आणि तिची मुलगी ( वय अंदाजे १०-११ वर्ष) गाडीखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा अंत झाला. या अपघातात स्कोडाचा मालकही किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करून त्याला सोडून देण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी ठाकुर्लीचा रहिवासी असलेल्या इक्बालला अटक केली असून रामनगर पोलिस स्थानकात त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवणे, समोरच्या गाडीचे नुकसान करणे, तसेच हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.