शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळप्रश्नी मोदी-पवार भेट

By admin | Updated: September 15, 2015 01:58 IST

महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातल्या दुष्काळाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. जवळपास ३० मिनिटांच्या या भेटीत पवारांचे म्हणणे ऐकून त्यातल्या प्रमुख मागण्यांत लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले मात्र कोणतीही ठोस घोषणा केली नाही.पंतप्रधानांच्या भेटीत पवारांनी मुख्यत्वे खरीपाची पिके नष्ट झाल्यामुळे निर्माण झालेली स्थिती, चारा वाटपाचा प्रश्न इत्यादी विषय मांडले. याखेरीज साखर निर्यातीचा प्रश्न मुख्यत्वे उपस्थित केला. पवार म्हणाले, राज्यात साखरेचे साठे पडून आहेत. राज्यातून ३0 हजार टन साखर निर्यात झाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यासाठी केंद्राने अनुदान द्यावे, डाळिंब, संत्री व द्राक्षबागांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही केंद्र व राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. मुंबईत सीआरझेड कायद्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांकडेही पवारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.दुष्काळग्रस्त भागाच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या जेल भरो आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, ‘हे जेल भरो आंदोलन नसून जेलसे रोको आंदोलन आहे’. त्यावर भाष्य करण्यास नकार देत पवार इतकेच म्हणाले, शेलारांना दुष्काळचे गांभीर्य कळते का? मराठवाड्यात प्रत्यक्ष जाऊ न दुष्काळ म्हणजे नेमके काय, ते कधी त्यांनी पाहिले काय? आंदोलनापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना भेटून दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले नाही म्हणून रस्त्यावर उतरावे लागले. शेलार यांच्या पोरकट विधानांमुळेच १० महिन्यांत लोकांचा सरकारवरचा विश्वास उडाला, हे त्यांनी लक्षात घ्यावे. विखे-पाटील यांना कोपरखळीपंतप्रधानांच्या भेटीनंतर आपल्या निवासस्थानी या भेटीची सविस्तर माहिती पवारांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, बाळासाहेब विखेंच्या ‘दुष्काळ पवारांमुळेच पडला’, या टीकेला थेट उत्तर न देता, पवार म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी राज्याचा मुख्यमंत्री नाही, ही बाब सर्वांनाच ठाऊ क आहे, तरीही काही लोक मलाच सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवतात. बहुदा वयामुळे त्यांना असे प्रश्न पडत असावेत.