शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन ४ आॅक्टोबरला

By admin | Updated: September 19, 2015 03:38 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला होणार आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला होणार आहे. रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम एका फ्रेंच कंपनीला आणि मुंबईतील प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांना देण्यात आले होते. दोघांनीही आपले आराखडे सादर केले आहेत. प्रभू यांनी स्मारकाच्या कामासाठी ४२५ कोटी रुपये खर्च येईल, असे नमूद केले होते. फ्रेंच कंपनीने खर्चाची रक्कम नमूद केली नव्हती. स्मारकामध्ये भव्य सभागृह, डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा, समृद्ध ग्रंथालय, बौद्ध स्तूप आदींचा समावेश असेल. इंदू मिलच्या जागेचा ताबा राज्य शासनाला या आधीच मिळाला आहे. (विशेष प्रतिनिधी)लंडनच्या घराचे पैसे सोमवारी भरणारलंडनमध्ये डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य होते ती वास्तू खरेदी करण्यासाठीची रक्कम घरमालकाला राज्य शासनाकडून सोमवारी अदा करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की वित्त विभाग आणि सामाजिक न्याय विभागाने याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. रिझर्व्ह बँकेत ही रक्कम जमा केली जाईल.