शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतील जाळपोळीमागे दलालांवर संशय

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

एजंटांना आरटीओ कार्यालयांमध्ये प्रवेश बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे, नागपूर येथे जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनांमागे दलालांपैकीच कुणाचा तरी हात असावा, असा संशय परिवहन उपायुक्तांनी व्यक्त केला आहे.

उपायुक्तांचे पत्र : पुनरावृत्तीची भीती, सर्व आरटीओंना सतर्कतेचे आदेशराजेश निस्ताने - यवतमाळ एजंटांना आरटीओ कार्यालयांमध्ये प्रवेश बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे, नागपूर येथे जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनांमागे दलालांपैकीच कुणाचा तरी हात असावा, असा संशय परिवहन उपायुक्तांनी व्यक्त केला आहे. या घटनांची अन्य ठिकाणीही पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करून सर्व आरटीओंना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. परिवहन आयुक्तालय मुंबई येथील उपायुक्त (अंमल-१) पुरुषोत्तम ज्ञा. निकम यांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी या संबंधीचे आदेश जारी केले. राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये एजंट तथा अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या या आदेशाची राज्यभर काटेकोर अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेक ठिकाणी एजंट विरुद्ध आरटीओ यंत्रणा असे वाद निर्माण झाले. त्यानंतर मध्य मुंबईच्या आरटीओ कार्यालयातील अभिलेखा कक्ष, ठाण्यातील आरटीओच्या आवारात जप्त असलेले बस, ट्रक, नागपूर आरटीओ कार्यालयात खासगी वाहनांची अज्ञात व्यक्तींकडून जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात अद्याप कुणीही आरोपी निष्पन्न झाले नाही. मात्र या तीनही घटनांमागे नाराज दलालांचाच हात असण्याची दाट शक्यता उपायुक्त निकम यांनी पत्राद्वारे व्यक्त केली. परिवहन कार्यालयात दलालांना बंदी केल्यामुळे त्यांच्याकडून जाळपोळीच्या या घटनांची अन्य कार्यालयांमध्येही पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या संभाव्य घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व आरटीओ, डेप्युटी आरटीओ, निरीक्षक व यंत्रणेला सतर्कतेचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) तर जागीच निलंबनआरटीओ कार्यालयांमध्ये अनधिकृत व्यक्तींच्या वावरास मनाई करण्यात आली आहे. त्यानंतरही काही अनधिकृत व्यक्ती आरटीओतील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करीत आहेत, कार्यालयाबाहेरुन कागदपत्रे पाठवून अनधिकृतपणे नागरिकांची कामे करून देत असल्याची माहिती परिवहन आयुक्तालयाला प्राप्त झाली आहे. हा गंभीर प्रकार तत्काळ थांबवा, तो पुन्हा निदर्शनास आल्यास संबंधितांवर जागीच निलंबन व अन्य कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निकम यांनी पत्रात नमूद केले.