शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडून डोंबिवलीच्या प्रदूषणाची दखल

By admin | Updated: September 25, 2014 05:21 IST

गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीगेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणा-या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, सजीवांच्या जीवस्वास्थ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची मागणी करून डोंबिवलीतील नागरिकांसह सामाजिक संस्थांनी घातलेल्या साकड्याची केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, दिल्ली बोर्ड यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.त्यानुसार, याबाबत लवकरच एक उच्चस्तरीय समिती नेमून तिचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचे आश्वासन पर्यावरणमंत्र्यांचे स्वीय सहायक गणेश रामदासी यांनी दिले. दक्ष नागरिक संघ आणि ईगल ब्रिगेड संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे याबाबतची सर्व माहिती दिली होती. त्यानुसार, तेथून गणेश यांनी संस्थेचे पदाधिकारी विश्वनाथ बिवलकर यांना बुधवारी ही माहिती दिली. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे परदेशी असून दोन दिवसांत भारतात आल्यावर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात एमआयडीसी परिसरात जाणवणारी ही समस्या आता पांडुरंगवाडी, गांधीनगर, आयरे रोड, पाटकर विद्यालय परिसर इतकेच नव्हे तर जुनी डोंबिवली, डोंबिवली पश्चिमेपर्यंत पोहोचली असून त्याचा त्रास शेकडो रहिवाशांना होत आहे.