शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर्स, वकील पोलिसांचे खबरे

By admin | Updated: August 1, 2015 01:25 IST

महाराष्ट्रात पोलिसांना दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक अशी महत्वाची गुप्त माहिती मिळण्याचे स्त्रोत आता डॉक्टर्स, वकील, अभियंते आणि विद्यार्थीही विकसित झाले आहेत.

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्रात पोलिसांना दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक अशी महत्वाची गुप्त माहिती मिळण्याचे स्त्रोत आता डॉक्टर्स, वकील, अभियंते आणि विद्यार्थीही विकसित झाले आहेत. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा स्वत:चा असा माहिती मिळविण्याचा मार्ग म्हणजेच पारंपरिक खबऱ्यांचे जाळे असते व त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करायला व ते सोडवायला मदत होते. आता खबऱ्यांचा नवा वर्ग आधुनिक सायबर गुन्हे तपासायला पोलिसांची मदत करीत आहे. गेल्या पंधरवड्यात याकूब मेमन फाशी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याच्या कामात या नव्या माहिती स्त्रोतांनी मदत केली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी अनेक पोस्ट आॅनलाईन मिडियावरून डिलीट केल्या.बुटांना पॉलीश करणारा, हॉटेलमधील वेटर किंवा मेकॅनिक यांच्याकडून मिळालेली माहिती पोलिसांना गुन्ह्यांतील संशयित पकडणे किंवा मुद्देमाल जप्त करण्याच्या कामात किती महत्वाची ठरते हे आपण अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांत बघितलेले असते. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा अशी गुप्त माहिती मिळविण्याचा स्त्रोत (मानवी खबरे) असतोच. त्यातून गुन्ह्यांची उकल व्हायला मदत मिळते. या खबऱ्यांनी दिलेली माहिती गुन्ह्याचा तपास करण्यासाठी किती महत्वाची आहे, संशयिताला किंवा गुन्हेगाराला अटक झाली का किंवा किती मुद्देमाल जप्त झाला यावरून त्यांना मोबदला दिला जातो. आता आम्ही अशी गुप्त माहिती मिळविण्यासाठी नवे स्त्रोत विकसित केले आहेत. ही मंडळी समाजातील उच्चभ्रू वर्गांचे प्रतिनिधित्व करीत असून गुन्ह्यांचा विषय बघता त्यांची माहिती खूप संवेदनशीलही असते, असे भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.ही माहिती देणारे स्त्रोत पैशांसाठी हे काम करीत नसून त्यांना आपण समाजाचे काही देणे लागतो, असे वाटते. मागे एखाद्या टिष्ट्वटमुळे किंवा एखाद्या फेसबुकमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे आता पहारा जमिनीवरच उपयोगाचा नाही तर सायबर जगातही लक्ष द्यावे लागेल. आमची यंत्रणा याकूब प्रकरणातसुद्धा यामुळे सावध होती, असे हा अधिकारी म्हणाला.