शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

संघाला नको राजकीय संरक्षण

By admin | Updated: May 31, 2014 01:01 IST

देशात पूर्ण बहुमत मिळून भाजपाचे सरकार आले ही गोष्ट चांगली आहे. आता देशात सुशासन आणण्याची त्यांची जबाबदारी आहेच. भाजपा सत्तेत आल्यामुळे संघाला लाभ होईल, अशा चर्चा सुरू आहेत.

कलम ३७0 वर चर्चा आवश्यकच : भाजपवर सुशासनाची जबाबदारी नागपूर : देशात पूर्ण बहुमत मिळून भाजपाचे सरकार आले ही गोष्ट चांगली आहे. आता देशात  सुशासन आणण्याची त्यांची जबाबदारी आहेच. भाजपा सत्तेत आल्यामुळे संघाला लाभ होईल,  अशा चर्चा सुरू आहेत. परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारे राजकीय संरक्षणाची आवश्यकता नाही,  अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टोक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील रेशीमबाग  स्मृती मंदिर परिसरात तृतीय वर्ष संघ शिबिर सुरू आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित  करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह डॉ.  कृष्णगोपाल यांनी वरील मत व्यक्त केले.देशात सध्या जम्मू व काश्मीरमधील ३७0 कलमावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात  संघाची भूमिका अगोदरपासूनच स्पष्ट आहे. देशातील कुठल्याही राज्यात भेदभाव होता कामा नये  व सर्वांंंना समान अधिकार देण्याची गरज आहे. ३७0 कलम आले त्यावेळी डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांनीदेखील त्याला विरोध केला होता. भाजपाने सत्तेवर येण्याअगोदर ३७0 संदर्भात  आश्‍वासन दिले होते. आता या मुद्यावर चर्चा व्हायलाच हवी, असे डॉ. कृष्णगोपाल म्हणाले.‘एफडीआय’ला       अप्रत्यक्षपणे विरोधमोदी सरकार संरक्षण क्षेत्रात १00 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे,  असे वृत्त शुक्रवारी समोर आले. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘दक्ष’ भूमिका घेतली असली  तरी अप्रत्यक्षरीत्या याला विरोध केला आहे. विदेशी कंपन्यांचे सहकार्य घेऊन देशातील संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि विकास झाला  तर ते चांगलेच आहे. परंतु संरक्षण विभागावर देशाच्या सुरक्षेची भिस्त आहे. त्यामुळे यात परावलंबी राहणे हे भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही. यासंदर्भात देशाला आत्मनिर्भर  करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत संघातर्फे मांडण्यात आले. आजच्या  घडीला संरक्षण क्षेत्रात फक्त २६ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे हे विशेष. (प्रतिनिधी)