शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री भ्रूणाचे मोल बीड जिल्ह्याला कळेना

By admin | Updated: June 23, 2014 04:26 IST

स्त्री- भू्रण हत्येच्या घटनांनी प्रतिमा मलीन झालेल्या बीड जिल्ह्याचे डोळे अजूनही उघडले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

संजय तिपाले, बीडस्त्री- भू्रण हत्येच्या घटनांनी प्रतिमा मलीन झालेल्या बीड जिल्ह्याचे डोळे अजूनही उघडले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात जिल्ह्याला एकही लाभार्थी मिळाला नाही. त्यामुळे त्यासाठी आलेले २५ लाख रुपये परत गेले. या वर्षातही सहा महिने उलटले तरी एकाही लाभार्थ्याचा शोध घेता आला नाही. जिल्ह्यात २०११ मध्ये दरहजारी मुलींचे प्रमाण ७९५ इतके खाली आले होते़ शिरुर तालुक्यात तर ते ७७९ वर घसरले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हा तालुका ‘रेड झोन’ मध्ये टाकला होता़ बीड, परळी येथे स्त्री- भ्रूण हत्येचे भयावह प्रकार लागोपाठ उघडकीस आल्यानंतर स्त्री भू्रण हत्येच्या प्रकरणात जिल्ह्यातील डझनभर डॉक्टरांना तुरूंगाची हवा खावी लागली. कन्येचा जन्म नाकारणाऱ्या जिल्ह्यातील अनेक घटनांनी संपूर्ण देश हादरला. त्यानंतर कन्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आरोग्य विभागाने सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हाभर जागर केला़ ‘लेक वाचवा अभियान’च्या अ‍ॅड़ वर्षा देशपांडे यांनी स्त्री- भू्रण हत्येविरोधी मोहीम बीडमध्ये येऊन गतीमान केली. त्याचा चांगला परिणामही पुढे दिसून आला़ आजघडीला स्त्री जन्मदर ९०३ वर पोहचला. ही समाधानाची बाब असली तरी जिल्हा प्रशासनाने या घटनांतून काहीच शिकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे साधे आवाहन करण्याची तसदीही घेतली नाही़ परिणामी आलेला निधी परत गेला़ यावर्षीही अशीच परिस्थिती आहे. २०१४मधील सहा महिने उलटले तरी एकही लाभार्थी मिळालेला नाही.