शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रडत्या नव्हे, लढत्या व्हा!

By admin | Updated: September 6, 2016 04:24 IST

बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे.

तिवसा (अमरावती): बैलांच्या मदतीने होणारी पारंपारिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. सगळीकडे यांत्रिकीकरण होत असताना महिलांनी धन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. आता महिलांनी रडत्या नव्हे, तर लढत्या बनण्याची गरज आहे असे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, अशा परिस्थितीत ताकदीने उभ्या राहणाऱ्या कर्तबगार शेतकरी महिलांच्या भव्य पोळ्याचे आयोजन सोमवारी दुपारी येथील पोलीस ठाण्यालगतच्या पटांगणात शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने करण्यात आले होते. विदर्भात प्रथमच महिला शेतकऱ्यांसाठी असा पोळा आयोजित करण्यात आला. यामध्ये ३१ महिला शेतकऱ्यांनी बैलजोड्यांसह सहभाग नोंदविला. यामध्ये उत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुमुद विवेक गौरखेडे या महिलेस साडीचोळी आणि २००१ रूपयांचे प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नेहा निलेश डागा यांनी द्वितीय, तर दामिनी रवि मकेश्वर यांना तृतीय बक्षीस देण्यात आले. महिला शेकतऱ्यांच्या पोळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. तिवस्याच्या नगराध्यक्षा राजकन्या खाकसे, ठाणेदार दिनेश शेळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>पैसेच नाहीत, बैलांना साज कुठून घालावा ?सर्वच महिलांनी बैलजोड्या सुंदर सजवून आणल्या. मात्र, शुभांगी डहाके या शेतकरी महिलेने धन्यासह उपस्थिती लावली खरी. पण, न सजविताच बैलजोडी पोळ्यात आणली होती. ‘पैसेच नसल्याने बैलांचा साज घेऊ शकले नाही’, असे मार्मिक वाक्य लिहिलेला फलक तिने बैलाच्या शिंगांवर लावला होता. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रत्येकजण अंतर्मुख झाला.