शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’ संस्थेवर बंदी नकोच!

By admin | Updated: October 12, 2015 05:32 IST

‘सनातन’वर बंदी घालणे योग्य नाही, सनातनने काय खून केलेले नाहीत, मग बंदी कशासाठी? असा प्रश्न भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांनी शनिवारी उपस्थित केला.

सावंतवाडी : ‘सनातन’वर बंदी घालणे योग्य नाही, सनातनने काय खून केलेले नाहीत, मग बंदी कशासाठी? असा प्रश्न भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांनी शनिवारी उपस्थित केला. पाकिस्तानी गझलकार गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करून शिवसेनेने आपली अपरिपक्वता दाखवली. कार्यक्रम रद्द करण्याच्या विरोधात भाजपा असून, आम्ही याचे कदापिही समर्थन करणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.वैभववाडी व दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून मधू चव्हाण यांची नेमणूक केली असून, या दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. यावेळी काही काळ ते सावंतवाडीतील विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.चव्हाण म्हणाले, ‘भाजपा आणि शिवसेना मित्रपक्ष असून, आमचे सरकार पाच वर्षांचा कालावधी व्यवस्थित पूर्ण करेल. आमच्यात काही भांडणे असतील, पण ती टोकाची नाहीत. ही धुसफूस होत राहणारच. राज्यमंत्र्यांना अधिकार मिळत नाहीत असे नाही, स्वतंत्र अधिकार देण्यात येणार नाहीत. भारतीय राज्यघटनेत असे अधिकार नाहीत, पण आजही भाजपाचा कोणताही कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या मंत्र्याचे अधिकार डावलत नाही.’इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेनेला योग्य ते स्थान दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बीडला जात आहेत, त्यामुळे शिवसेनेची नाराजी असण्याचा कोणताही प्रश्नच येत नसल्याचे मत मधू चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)