शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी मतांची विभागणी भाजपाला फायदेशीर

By admin | Updated: October 10, 2014 05:32 IST

अवघ्या पाच दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी तर अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.

अवघ्या पाच दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी तर अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. अशावेळी मुंबई उपनगरातील २६ जागांसाठी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसेत अक्षरश: हातघाईच्या लढाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार जिवाचा आटापिटा करीत आहेत. पक्षाचे स्टार प्रचारक, खासदार आणि सेलिब्रेटी प्रचारफेऱ्या आणि सभांमध्ये दिसू लागले आहेत.विद्यमान जागा राखण्यासाठी काँग्रेस उमेदवार जंगजंग पछाडत असताना पुनरागमनासाठी शिवसेना उमेदवारांनी कंबर कसली आहे. तर, गुजराती मतांच्या भरोशावर मुंबईतील सामर्थ्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपा नेत्यांची धडपड आहे. गेल्या वेळी उपनगरात ११ ठिकाणी काँग्रेस विजयी झाली. शिवसेना, भाजपा आणि मनसेला प्रत्येकी ४ जागांवर यश मिळाले. २ जागांवर राष्ट्रवादी आणि शिवाजीनगर मानखुर्द येथे अबू आझमींच्या रूपात सपाला १ जागा मिळाली. उपनगर असो अथवा महानगर राष्ट्रवादीचे अस्तित्व तसेही औषधापुरतेच असल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि मनसे अशीच चौरंगी लढत येथे रंगू लागली आहे. उमेदवारांचा व्यक्तिगत जनसंपर्क, परंपरागत मतदारांवर काँग्रेसची मदार आहे. स्वाभाविकपणे शिवसेना व मनसेने मराठी मतांच्या आशेवर आपली राजकीय गणिते मांडली आहेत. तर, गुजराती मतांवर भाजपाचा डोळा आहे. बिगर मराठी मतदारांचा पाठिंबा आणि मराठी मतातील विभाजनाने गेल्या वेळी काँग्रेसने यशाला गवसणी घातली. पण, लोकसभेतील मोदी लाटेने सारी समीकरणे बिघडून टाकली आहेत. गुजराती मते पूर्णपणे भाजपाकडे वळली आहेत. तर युती तुटल्याने उत्तर भारतीय मतांची बेरीजही भाजपासाठी आशादायी आहे. या बेरजेच्या गणिताचा फटका बसू नये यासाठी काँग्रेस उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पण, विद्यमान संख्याबळ कायम राखताना मात्र काँग्रेसची दमछाक होणार आहे. राज ठाकरेंच्या सभांच्या आधारे वातावरण बदलण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज यांच्या सभांमुळे मनसेचे इंजिन ट्रॅकवर येत असल्याचे चित्र असले तरी २००९ प्रमाणे मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाही. मनसेसमोर आहे त्या जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे. विकासाचा मुद्दा रेटतानाच गुजराती आणि उत्तर भारतीय राजकारणावर राज ठाकरेंचा आसूड फुटत आहे. विकासाचे आश्वासन आणि मराठी अस्मितेच्या आधारे आपली मते राखण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. पण, भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने जाणीवपूर्वक मुंबईच्या गुजरातीकरणाचा मुद्दा लावून धरल्याने आता मराठी मतदारांचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. पण, भाजपावरील टीकेच्या आधारे मराठी मते राखण्यात शिवसेना काही प्रमाणात यशस्वी होण्याची शक्यता आहे.