सरकारला स्वस्तुतीचा आजार - अशोक चव्हाण

By Admin | Updated: January 14, 2017 04:26 IST2017-01-14T04:26:51+5:302017-01-14T04:26:51+5:30

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र

Dissemination of the government - Ashok Chavan | सरकारला स्वस्तुतीचा आजार - अशोक चव्हाण

सरकारला स्वस्तुतीचा आजार - अशोक चव्हाण

नांदेड : खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी टीकस्त्र सोडले. सरकारला स्वस्तुतीचा आजार जडल्याचे ते म्हणाले.
खादीच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी देशवासीयांना स्वावलंबनाचा संदेश दिला़ ही प्रेरणा सदोदित राहावी यासाठी खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवर सूतकताई करतानाचे गांधीजींचे छायाचित्र छापण्यात येत होते़ त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापून सरकारी यंत्रणांनी कहर केला आहे़ हा राष्ट्रपित्याचा अवमान आहे़ ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे़ सरकारने माफी मागितली पाहिजे, असेही खा़ चव्हाण म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: Dissemination of the government - Ashok Chavan