शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महासत्तेचे स्वप्न पेरणारे नेतृत्व हरपले

By admin | Updated: July 29, 2015 02:14 IST

भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती

मुंबई : भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कलाम आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई यांना श्रद्धांजली वाहून विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल आणि अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.मुख्यमंत्री म्हणाले की, आज देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना डॉ. कलाम आपल्यातून निघून जावेत ही शोकांतिका आहे. आपल्या देशात युवक शक्तीची ताकद ओळखून त्याचा लाभ कशा रीतीने घेतला पाहिजे याची उत्तम जाणीव त्यांना होती. भारत हा तरुणाईने समृद्ध देश होणार हे ओळखून युवाशक्तीला मनुष्यबळात परावर्तित केल्यास देश जागतिक महासत्ता होऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता. रिपब्लिकन पार्टीचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या निधनाने राज्याच्या समतावादी चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला असून, आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी झालेय.वाचन पे्ररणा दिवसडॉ. कलाम यांचे लेखन पे्ररणादायी होते आणि त्यांना वाचनाचा छंद होता. त्यांची स्मृती सदैव राहावी यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयांमधून त्यांचा जयंती दिन (१५ आॅक्टोबर) हा ‘वाचन पे्ररणा दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.स्मृतिदिन बालविज्ञान दिनएपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन राज्य शासनाने ‘बालविज्ञान दिवस’ म्हणून घोषित करावा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी केली. कलाम आणि रा.सू. गवई यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला त्या वेळी सभापती बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, प्रा. जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील, जनार्दन चांदूरकर यांची या वेळी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करणारी भाषणे झाली.