शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार मेळ्यामध्ये डिजिटल महाराष्ट्र

By admin | Updated: November 13, 2016 03:19 IST

प्रगती मैदानावर १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्रातर्फे ‘डिजिटल महाराष्ट्र’ हे दालन उभारण्यात येणार असून, त्यामुळे राज्याची वनसंपदा

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीप्रगती मैदानावर १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्रातर्फे ‘डिजिटल महाराष्ट्र’ हे दालन उभारण्यात येणार असून, त्यामुळे राज्याची वनसंपदा, उद्योग क्षेत्रातील प्रगती इत्यादीचे डिजिटल व व्हर्च्युअल दर्शन देश-विदेशातील ग्राहकांना व पर्यटकांना घडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ नोव्हेंबर रोजी या दालनाचे उद्घाटन करणार असून, अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री सुभाष देसाई असतील. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन संघटनेतर्फे दरवर्षी या तारखांना आंतराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन केले जाते. यंदा संकल्पना डिजिटल इंडिया आहे. व्यापार मेळ्यात २४ देश, भारतातील २७ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्या दालनात तळमजल्यावर लघुउद्योगांचे ८0 स्टॉल्स विक्री व प्रदर्शनासाठी असतील. विविध हस्त शिल्प कलांच्या प्रात्यक्षिकांसाठी १८0 हस्त शिल्पकारांसह लघुउद्योजकही यात सहभागी आहेत. तसेच महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सिडको, सिकॉम यांचेही स्टॉल्स असतील. राज्याच्या दालनात सनई-चौघडा वादनासह लोकवाद्ये, तुतारीच्या निनादात स्वागत केले जाणार असून, ‘शाबास इंडिया’ पथकातर्फे तलवारबाजी, शारीरिक कसरती दांडपट्टा सादर करण्यात येतील. रोज विविध लोककला सादर केल्या जातील आणि २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र संस्कृती दर्शन दिन कार्यक्रम होईल. त्यात कलारंजन सांस्कृतिक पथकाचे ३४ कलाकार सहभागी होत आहेत.जगातील ७ हजार कंपन्या उत्पादनांसह सहभागी होत आहेत. आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह २४ देशांतील २४0 कंपन्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीचे भव्य स्टॉल्स आहेत. दक्षिण कोरिया या मेळ्याचा भागीदार देश असून, बेलारूस फोकस देश आहे. हरयाणा हे फोकस राज्य तर मध्य प्रदेश व झारखंड ही भागीदार राज्ये आहेत. व्यापारी वर्गासाठी १४ ते १८ नोव्हेंबर हे पाच राखीव आहेत, तर १९ नोव्हेंबरपासून सर्वसामान्य जनतेला मेळा खुला होईल.