जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 07:43 PM2020-08-26T19:43:16+5:302020-08-26T20:46:02+5:30

एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

dhananjay munde demands postponement of jee neet mpsc exams in corona situation | जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन जेईई (JEE), नीट (NEET) परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी, यासाठी राज्य सरकारच्यावतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी, अशी पत्राद्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे  मागणी केली आहे.

केंद्रीय स्तरावर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा तसेच वैद्यकीय शिक्षणास प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या घेणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकते. या परीक्षेमध्ये राज्यातूनही लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. परंतु सध्यस्थितीत ही परीक्षा घेणे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने केंद्राकडे ही परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्याबाबत आग्रही मागणी करावी, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

याचबरोबर, येत्या 20 सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा (एमपीएससी) लेखी परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. या परीक्षेची तारीख कोरोनामुळे याआधीही बदलण्यात आली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीतीमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एमपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य यांसह इतर बाबींचाही अडचण झालेली आहे, त्यामुळे ही परीक्षा देखील आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, असे धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

याशिवाय, एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान जेईई , नीट तसेच एमपीएससी या तीनही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, दळणवळणाच्या बाबतीतील मर्यादा, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करत निर्णय घेण्यात यावा, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आणखी बातम्या...

"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र     

धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

Web Title: dhananjay munde demands postponement of jee neet mpsc exams in corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.