शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस...; मराठा आरक्षणावर राम कदमांचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:43 IST

Ram Kadam on Maratha Reservation: लोकसभेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता पुन्हा या आंदोलनाने धार पकडायला सुरुवात केली असून राज्यातील सरकार डॅमेज कंट्रोलसाठी धडपडू लागले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय वाढला आहे. मनोज जरांगे पाटलांनी लाखो आंदोलकांना घेऊन मुंबई गाठली होती. परंतू त्यांना मुंबईच्या वेशीवरच मुख्यमंत्र्यांनी थांबवून आरक्षण देण्याचे जाहीर करत माघारी पाठविले होते. यानंतर लोकसभेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता पुन्हा या आंदोलनाने धार पकडायला सुरुवात केली असून राज्यातील सरकार डॅमेज कंट्रोलसाठी धडपडू लागले आहे. भाजपाचे नेते राम कदम यांनी आरक्षणावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

मराठा समाजाची 50 वर्षांपासून आरक्षणाची मागणी आहे. या दरम्यान अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. शरद पवार तीनदा मुख्यमंत्री झाले. यांच्यापैकी एकालाही कधी मराठा समाजाची आठवण झाली नाही. पहिल्यांदा आरक्षण देण्याचा आणि मराठा समाजा दिलेला आरक्षण कोर्टात टिकवण्याचे काम जन्माने ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केले. काय अपराध आहे त्यांचा? अपराध जर कोणाचा असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यांच्या कर्तव्य शून्यतेमुळे कोर्टात टिकवता आले नाही, असा आरोप राम कदम यांनी केला. 

अपराध जर कोणाचा असेल तर शरद पवार यांचा देखील आहे. त्यांनी मुख्यमंत्री असून त्यांना मराठा समाज का? आठवला नाही. अपराध जर कोणाचा असेल तर त्या काँग्रेसमधील दुटप्पी नेत्यांचा आहे. आता नुकतेच अधिवेशन झाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावली होती. याबैठकीला काँग्रेसवाले का आले नाहीत, उबाठा देखील का आले नाहीत. कोणी अडवले होते या नेत्यांना असा सवाल राम कदम यांनी केला. 

या तीनही पक्षाची भूमिका ही आजही समाजामध्ये भांडण लावण्याची आहे. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस म्हणून पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देखील झोकून देऊन काम करत आहेत. ही गोष्ट नाकारता येणार नाही. सरकारची भूमिका आरक्षणाविषयी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. पण या तिघांची भूमिका काय हा सवाल आपण त्यांना कधी विचारणार आहोत, असा सवालही कदम यांनी केला. 

टॅग्स :Ram Kadamराम कदमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण